अनैतिक सबंधांसाठी मुलाची हत्या करणाऱ्या आईला 10 वर्षे सक्तमजुरी

पुणे | अनैतिक सबंधांमध्ये अडथळा होत असल्यानं स्वत:च्या मुलाची हत्या करणाऱ्या आईला पुणे सत्र न्यायालयाने 10 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. राखी बालपांडे असं या क्रूर आईचं नाव आहे.

आॅगस्ट 2015 मध्ये राखीने आपला 13 वर्षाचा मुलगा चैतन्यची बॅटनं मारहाण करत हत्या केली होती. नवऱ्यासोबत पटत नसल्यानं ती मुलासह पुण्यातील टिंगरेनगर भागात राहात होती.

राखी बालपांडेचे प्लॅट मालकाचा मुलगा सचिन मोरेसोबत अनैतिक संबंध होते. या संबंधांमध्ये चैतन्यचा अडथळा ठरत होता.

दरम्यान, राखीचा प्रियकर सचिन मोरेविरोधात पुरेसे पुरावे नव्हते, त्यामुळे न्यायालयानं त्याला निर्दोष मुक्त केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-अयोध्येत श्रीरामाचा 100 मीटर उंचीचा पुतळा उभारणार; योगी आदित्यनाथांची योजना

2 महिन्यांचा पाठलाग; टी 1 वाघिण अखेर ठार

रामदास आठवलेंकडून शरद पवारांना उपपंतप्रधान पदाची आॅफर!

-एेश्वर्या रायला लालूच्या पोरानं पाठवली घटस्फोटाची नोटीस!

-क्रिकेटच्या मैदानात देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी!