पुणेकरांचा प्रवास होणार सोयीस्कर; पुण्याच्या मध्यभागी राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा

Pune News

Pune News | पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कसबा विधानसभा मतदारसंघात दोन महत्त्वाच्या भुयारी मार्गांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.

शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा या मार्गांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. या प्रस्तावित भुयारी मार्गांमुळे नागरिकांचा (Pune News) प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होईल.

भुयारी मार्गांसाठी तातडीने बैठक घेण्याची मागणी

या महत्त्वाच्या विषयावर कसबा मतदारसंघातील भाजप आमदार हेमंत रासने यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले (Chhatrapati Shivendrasingh Raje Bhosale) यांची भेट घेतली. यावेळी भुयारी मार्गांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची मागणी करण्यात आली. या बैठकीत वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी भुयारी मार्गांचे फायदे, अंदाजित खर्च आणि संभाव्य कालावधी यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

याशिवाय, पुण्यातील मामलेदार कचेरी येथे रखडलेल्या प्रशासकीय इमारतीच्या कामालाही गती देण्याची विनंती करण्यात आली. प्रशासकीय कामकाजासाठी ही इमारत अत्यंत महत्त्वाची असून, लवकरात लवकर पूर्ण झाल्यास नागरी सुविधा सुधारतील. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी या दोन्ही विषयांवर सकारात्मक भूमिका घेत तातडीने कार्यवाहीचा शब्द दिला आहे.

Pune News | वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा मिळण्याची शक्यता

हे भुयारी मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर पुणेकरांना मोठा दिलासा मिळेल. वाहतूक कोंडीमुळे वेळेचा आणि इंधनाचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होतो. नवीन मार्गांमुळे हे सर्व अडथळे दूर होऊन वाहतूक व्यवस्थापन अधिक सुरळीत होण्यास मदत होईल. तसेच, मामलेदार कचेरी इमारतीच्या कामाला गती मिळाल्यास प्रशासकीय कामे अधिक वेगवान आणि प्रभावीपणे पार पडतील.

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .