CREDAI Report l ‘क्रेडाई पुणे मेट्रो आणि सीआरई मॅट्रिक्स’ (CREDAI Pune Metro and CRE Matrix) च्या अहवालानुसार, पुणे (Pune) शहर 2024 मध्ये घर खरेदीसाठी देशात अव्वल ठरले आहे. 2020 मधील विक्रीच्या तुलनेत 56 टक्के वाढ झाली असून, घरांच्या विक्रीचे मूल्य 65 हजार कोटींवर पोहोचले आहे.
देशात पुणे गृहखरेदीसाठी अव्वल :
टॉप गिअरवर चालणारे क्षेत्र: महाराष्ट्राची (Maharashtra) सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी असलेल्या पुण्याचा रिअल इस्टेट (Real estate) क्षेत्राने मोठी प्रगती केली आहे.परवडणाऱ्या किमतीमुळे
प्रकल्प वाढीला चालना: पुणे हे भारतातील सर्वांत परवडणारे मेट्रो शहर आहे. घराची सरासरी किंमत 73 लाख रुपये आहे, त्यामुळे बंगळूरू (Bengaluru) (1.35 कोटी) आणि हैदराबाद (Hyderabad) (1.75 कोटी) सारख्या शहरांच्या तुलनेत ते अधिक परवडणारे आहे.
45 लाखांपेक्षा परवडणारी घरे: 45 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांचा वाटा 2020 मध्ये 55 टक्के होता, तो 2024 मध्ये 30 टक्के झाला आहे.
विक्रीतील भौगोलिक केंद्रीकरण: 75 टक्क्यांपेक्षा जास्त घरांची विक्री पुणे वायव्य (हिंजवडी-महाळुंगे), पुणे ईशान्य (खराडी-वाघोली) आणि पुणे उत्तर (पिंपरी-चिंचवड) या भागांमध्ये झाली.
लक्षणीय प्रादेशिक वाढ: पुणे नैऋत्य (कोथरूड-बावधन) मध्ये 2020 ते 2024 या कालावधीत घरांच्या सरासरी किमतीत 55 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
बाजारपेठेतील वेगवान वाढ: गेल्या पाच वर्षांत पुण्याच्या निवासी बाजारपेठेने घरांच्या विक्रीच्या एकूण मूल्यात 22 टक्क्यांचा वार्षिक चक्रवाढ दर (CAGR) नोंदवला आहे.
खरेदीदारांच्या पसंतीमध्ये बदल: 2024 मध्ये 70 लाखांपेक्षा कमी किमतीच्या घरांचा विक्रीतील हिस्सा 60 टक्के होता, जो 2020 मध्ये 85 टक्के होता. यावरून मोठ्या आणि अधिक प्रीमियम (Premium) घरांकडे कल वाढल्याचे दिसून येते.
लक्झरी घरांच्या मागणीत वाढ: गेल्या पाच वर्षांत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरांची विक्री 5 पट वाढली आहे, जी लक्झरी आणि प्रीमियम घरांची वाढती मागणी दर्शवते.
भविष्यातील दृष्टिकोन: औद्योगिक वाढ आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे पुण्याची रिअल इस्टेट बाजारपेठ शाश्वत विस्तारासाठी सज्ज आहे. प्रीमियम घरांची वाढती मागणी आणि वाढत्या स्थलांतरामुळे, भारतातील सर्वांत गतिमान रिअल इस्टेट डेस्टिनेशन (Real estate destination) म्हणून पुण्याचे स्थान आणखी मजबूत होण्याची अपेक्षा आहे.
CREDAI Report l बांधकाम क्षेत्रात पुण्याचे वर्चस्व :
2024 मध्ये पुण्याने सुमारे 90 हजार घरांची विक्री करत देशात अव्वल स्थान कायम राखले आहे. घरांच्या विक्रीचे एकूण मूल्य 65 हजार कोटी रुपये असून, 2019 मधील 30 हजार कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात 116 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. 51 टक्के गुंतवणूकदार इक्विटी, सोने किंवा मुदत ठेवींसारख्या इतर पर्यायांपेक्षा रिअल इस्टेटला (Real estate) पसंती देतात.