Pune Traffic Diversion l देशभर पुण्याचे गणपती प्रसिद्ध आहेत. कारण देशभरातून अनेक भक्त गणपती काळात दर्शनाला येत असतात. मात्र आता पुण्यात गणपती पाहायला येत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आज पाच दिवसांच्या पाहुण्याचे म्हणजेच गणरायाचे विसर्जन होत आहे. त्यामुळे अनेक जण पुणे शहर परिसरातील मानाचे गणपती, देखावे पाहण्यासाठी शहरात मोठ्या संख्येने येत असतात. मात्र यावेळी शहरात वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते. त्यामुळे गणेश भक्तांना गणेशोत्सवाचा आंनद घेता यावा यासाठी आजपासून पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील काही रस्ते सायंकाळी ५ नंतर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे.
तब्बल ‘इतक्या’ दिवस रस्ते बंद राहणार :
पुणे वाहतूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून म्हणजेच दिंनाक. 11 ते 18 सप्टेंबरपर्यंत पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ते सायंकाळी 5 नंतर वाहतुकीस बंद राहणार आहेत. यामध्ये लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, शिवाजी रस्ता हे रस्ते वाहतुकीस बंद राहणार आहेत. तसेच शहरातील मुख्य रस्ते बंद राहणार असल्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
वाहतुकीस बंद असणारे मार्ग :
लक्ष्मी रस्ता (इमजे खान चौक ते टिळक चौक), बाजीराव रस्ता (पूरम चौक ते अप्पा बळवंत चौक), शिवाजी रस्ता (गाडगीळ पुतळा चौक ते देशभक्त केशवराव जेथे चौक, स्वारगेट), टिळक रस्ता (मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ते हिराबाग चौक).
Pune Traffic Diversion l अंतर्गत कोणते रस्ते बंद राहणार? :
सिंहगड गरेज (घोरपडे पेठ ते राष्ट्रभूषण चौक ते हिराबाग चौक), कै. अनंत बाळकृष्ण नाईक पथ ते टिळक रस्ता, सणस रस्ता (गोटीराम भैया पाक मंडई ते गोविंद हलवाई चौक), दिनकरराव जवळकर चौक ते पायगुडे चौक ते हिराबाग चौक, पानघंटी चौक ते गंज पेठ पोलिस चौकी, गायकसाब मशीद ते सेंटर स्ट्रीट पोलिस चौकी (लष्कर), कोहिनूर चौक ते बाबाजान चौक (लष्कर), गंज पेठ ते वीर लहुजी वस्ताद तालीम चौक, जेधे प्रासाद रस्ता, सुभानशाह दर्गा, पार्श्वनाथ चौक, गुरी नानक पथ ते हमजे खान चौक (देवजीबाबा चौक, गणेश पेठ), शास्त्री चौक ते सोन्या मारुती चौक, मंडई ते शनिपार, शनिपार ते फुटका बुरूज, शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौक ते मंडई, अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक, या भागांत वाहने लावण्यास मनाई असणार आहे.
शहरातील हे रस्ते असणार बंद; पर्यायी मार्ग कोणता? :
1) लक्ष्मी रस्ता – (हमजेखान चौक ते टिळक चौक)
असा असणार पर्यायी मार्ग – हुल्या मारुती चौकातून उजवीकडे वळून दारूवाला पूल मार्गे, तसेच हमजेखान चौकातून डावीकडे महाराणा प्रताप रोडने घोरपडी पेठ पोलिस चौकी- शंकर शेठ रोडने पुढे जावे. तसेच सोन्यामारुती चौकातून डावीकडे वळून मिर्जा गालीब रोड जंक्शनकडे जाऊन इच्छितस्थळी जावे.
2) शिवाजी रस्ता – (गाडगीळ पुतळा चौक ते केशवराव जेये चौक, स्वारगेट)
असा असणार पर्यायी मार्ग – शिवाजीनगर- स्वारगेटकडे जाताना स. गो. बर्वे चौक- जेएम रोड- अलका चौक टिळक रोड, शास्त्री रोडने सिमला चौक-कामगार पुतळा चौक- शाहीर अमर शेख बोल्हाई चौकमार्गे नेहरू रोडने पुढे जावे. कुंभारवेस चौकातून : पवळे चौक, साततोटी चौक, उजवीकडेवळून देवजी बाबा चौक, हमजेखान चौक, महाराणा प्रताप रोडमार्गे घोरपडी पेठ पोलिस चौकी, उद्यान, झगडे आळी ते शंकर शेठ रोड. दुचाकी वाहने गाडगीळ पुतळा, लालमहलपर्यंत, तेथून दुचाकीस्वारांनी डावीकडे फडके हौद चौकमार्गे दारूवाला पूलमार्गे पुढे इच्छितस्थळी जावे.
3) बाजीराव रस्ता – (पूरम चौक ते एबीसी चौक)
असा असणार पर्यायी मार्ग – पूरम चौक, टिळक रोडने टिळक चौक उजवीकडे वळून केळकर रस्त्याने आप्पा बळवंत चौकातून इच्छितस्थळी जावे.
4) टिळक रस्ता – (मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ते हिराबाग चौक0
असा असणार पर्यायी मार्ग – जेधे चौक, नेहरू स्टेडियम समोरील एकेरी मार्गान जमनलाल बजाज पुतळा उजवीकडे वळून पूरम चौक व हिराबागकडे जाऊन इच्छितस्थळी जावे.
News Title : Pune Traffic Diversion
महत्वाच्या बातम्या-
पुढील 2 महीने ‘या’ 3 राशींवर असणार शनीदेवाची कृपा!
लाडक्या बहीणींच्या खात्यात जमा होणार थेट 4500 रुपये?, ‘या’ दिवशी येणार पैसे?
“भारताला हिंदू राष्ट्र कायम ठेवायचं असेल तर, मोदींनी देशाचं नेतृत्व योगींकडे द्यावं”
आज गौरी पूजन, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत
लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ 4 राशींचं नशीब चमकणार, मिळणार अमाप पैसा!