बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे हादरलं! शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकाकडून 15 वर्षीय मुलीवर बलात्कार

पुणे | सध्या अनेक राज्यांमध्ये लाॅकडाऊन करण्यात आलं आहे. अशातच पुण्यात देखील टाळेबंदी असून पुण्यात अनेक हत्यांच्या तसेच बलत्कारांच्या घटना समोर येत आहेत. यादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकाने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे.

संबंधित आरोपीचं नाव चेतन कोटमळे असं असून चेतन केवळ 27 वर्षांचा आहे. ही घटना उघडकीस तेव्हा आली जेव्हा संबंधित अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचं समजलं.

संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी विरुद्धात तक्रार नोंदवली आहे. यादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. ती म्हणजे संबंधित मुलीचे शेजारी हे आरोपीचे नातेवाईक आहेत.

दरम्यान, आरोपीने संबंधित अल्पवयीन मुलीला टेरेसवर नेऊन तिची छेडछाड काढली. त्यानंतर आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. या कारणामुळे संबंधित मुलगी गरोदर राहिली. या प्रकरणाचा अधिक तपास आता लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप

फेरे घेतल्यानंतर मंडपातून नवरी फरार, कारण ऐकून नवरदेवाच्या पायाखालची जमीन सरकरली

सावधान! कोरोनातून बऱ्या होणाऱ्या मुलांना होतोय ‘हा’ आजार

“आम्हाला तुमचा अभिमान, उद्धव ठाकरे खरंच बेस्ट सीएम आहेत”

लॉकडाऊन इफेक्ट, उत्तर प्रदेशातून दिसतायत हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More