पुणे | पुणे शहरासाठी गुंडागर्दी काही नवी नाही. पुण्यात गटागटांमध्ये मारामाऱ्या, खून, अपहरणाच्या घटना वेळोवेळी समोर आल्या आहेत. यातच आता पुणे शहराला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. एका तडीपार गुंडाने चक्क एका पोलीस हवालदाराचा भर रस्त्यात खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजजवळ मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. हवालदार समीर सय्यद हे बंदोबस्त आटोपून घरी चालले होते. सय्यद हे खडक पोलीस लाईनमध्ये राहायला होते. सय्यद हे श्रीकृष्ण टॉकीजजवळ पोहोचले असता प्रवीण महाजन या गुंडाने समीर सय्यद यांच्यावर चाकूने सपासप वार करून खून केला. या घटनेनंतर पुणे शहर चांगलंच हदरलं आहे.
मंगळवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास आम्हाला फोनवरून माहिती मिळाली होती. बुधवार केंजळे चौकाजवळील ढमढेरे बोळात जाणार्या रोडवर हॉटेलसमोर एका व्यक्तीवर चाकूने वार झाले असल्याचं सांगण्यात आलं होतं. आम्ही काही मिनिटात घटनास्थळी पोहोचलो. यावेळी तिथे हवालदार समीर सय्यद रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसलं. चौकशी केली असताना पव्या महाजनने हल्ला केल्याचं सांगण्यात आलं आहे, अशी माहिती फरासखाना पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी दिली आहे.
आम्ही रस्त्यावरून जाणारी एक रुग्णवाहिका थांबवून समीर सय्यद यांना रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी आरोपी प्रवीण महाजन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं देखील श्रीकांत सावंत यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, प्रवीण महाजन याला अटक करण्यात आली आहे. सय्यद यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.
थोडक्यात बातम्या-
“घरावर दरोडा घालून माझ्या 2 गाड्या चोरल्या”; परमबीर सिंह आणि प्रदीप शर्मावर गंभीर आरोप
केंद्र सरकारची मोठी घोषणा; राज्यातील कोरोना योद्ध्यांना पुन्हा मिळणार 50 लाखांचं विमा संरक्षण
मराठा आरक्षणाच्या निकालाआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलवली तातडीची बैठक
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, पण मृतांचा आकडा वाढला
‘ड्रॅगनचे पाप, जगाला ताप; चिनी रॉकेट्स कोसळून जगाचा नरक करणार’
Comments are closed.