बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे हादरलं! आई-वडिल मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर 19 वर्षीय तरूणीवर घरात घुसून बलात्कार

पुणे | पुणे शहरात दिवसेंदिवस गुनह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. अशात पुण्यात घडलेल्या एका घटनेनं पुण्याला हादरवून सोडलं आहे. सकाळ-सकाळी तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

संबंधित तरुणीला आरोपीने 2017 मध्ये रस्त्यात आडवून बावधान टेकडीवर नेलं होते. तिथं तिच्यासोबत अश्लील बोलून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर 2019 मध्ये तरुणीचे आई-वडिल माॅर्निग वाॅकला गेले असता आरोपीने तरुणीच्या घरात घुसून तिचा पुन्हा एकदा बलात्कार केला. यावेळेस त्याने बलात्कार करताना तिचा एक व्हिडीओ बनवला. त्या व्हिडीओद्वारे आरोपी तरुणीला सतत शारीरिक संबंधाची मागणी करत असल्याचं समोर आलं आहे.

शारीरिक संबंधाची मागणीला तरुणीने नकार दिल्यानंतर आरोपीने व्हिडीओचा स्क्रीनशाॅट काढला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. तसेच शारीरिक संबंध न ठेवल्यास व्हिडीओ घरात दाखवून सगळीकडे व्हयरल करण्यात येईल, अशी धमकी आरोपीने तरुणीला दिली. हा संपूर्ण प्रकार 2017 पासून सुरु झाला आणि 2021 पर्यंत चालू राहिला. तरुणीच्या एका मित्राने यामध्ये हस्तक्षेप केल्यावर आमच्यामध्ये न पडण्याचा सल्ला आरोपीने त्याला दिला.

दरम्यान, या संपुर्ण प्रकरणाचा सध्या अधिक तपास चालू आहे. मात्र या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. संबंधित आरोपीचं नाव अण्णा उर्फ सुहास शिंदे असं आहे. तसेच शिंदेच्या विरुद्ध चतुःश्रूंगी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

थोडक्यात बातम्या-

प्रसिद्ध वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं कोरोनामुळे दुर्दैवी निधन

रणधीर कपूर यांनी ‘या’ कारणाने वडिलोपार्जित घर विकण्याचा घेतला निर्णय, म्हणाले…

…म्हणून तरुणाने स्वतःच्याच बापाच्या हत्येसाठी दिली 10 लाखांची सुपारी

18 वर्षांवरील लसीकरणाबाबत आरोग्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ मोठं वक्तव्य

बाबो! …अन् चालू मॅचमध्ये सूर्यकुमार यादवने केलं पत्नीला किस

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More