बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे हादरलं! दत्ता फुगेंच्या मुलाच्या कानशिलात लगावल्याचा राग, तरुणाची हत्या

पुणे | पिंपरी चिंचवड मधील भोसरी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिवंगत गोल्डमॅन दत्ता फुगे यांचा मुलगा शुभम फुगे याच्या कानशिलात लगावल्याने तीन युवकांनी मिळून आपल्याच मित्राचा खून केला आहे. या घटनेमुळे पुणे शहर हादरलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम आणि अमन सुरेश डांगळे नावाचा तरुण दोघेजण दारू पित बसले होते. दारु पिताना या दोघांमध्ये काही कारणावरुन वाद झाला. यामुळे अमन याने शुभमच्या कानशिलात लगावली. याचाच राग आल्याने शुभम आणि त्याच्या इतर दोन साथीदारांनी मिळून अमनची हत्या केली.

दोन दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास पोलिसांना अमनचा मृतदेह हाती लागला होता. यानंतर पोलिसांनी या हत्येचा तपास सुरू केला. पोलिसांनी याप्रकरणी शुभम फुगेसह त्याच्या दोन साथीदारांना गजाआड टाकलं आहे. या तिघांवर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी गोल्डमॅन दत्ता फुगे सोन्याचा शर्ट घातल्यामुळे चर्चेत होते. पुण्यातील दिघी परिसरात फुगे यांची देखील हत्या झाली होती. शुभम या घटनेचा महत्वाचा साक्षीदार होता. दत्ता फुगे यांच्या पत्नी सीमा फुगे या माजी नगरसेविका आहेत.

थोडक्यात बातम्या –

“शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचे लोक देखील गांभीर्योने घेत नसावेत”

बाबो! प्रशिक्षकाने मॅच अगोदर महिला खेळाडूच्या लावली कानशिलात; टोकियो ऑलिम्पिकमधील व्हिडीओ व्हायरल

“भाजपवाले मत मागायला येतील दोन पायांवर पण जातील चौघांच्या खांद्यावर”

राज कुंद्राने लॅाकडाऊनमध्ये फक्त पाचच महिन्यात कमावले ‘एवढे’ कोटी रुपये!

“भाजप आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More