पुणे महाराष्ट्र

‘या’ तारखेपासून पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग पुन्हा सुरु होणार

पुणे | पुणे महापालिका प्रशासनाच्या परवानगीनंतर तुळशीबाग एक जूनपासून सुरु होत आहे. महिला आणि तरुणाईची खरेदीसाठी झुंबड उडणारी तुळशीबाग ‘कोरोना’ लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जवळपास अडीच महिने बंद होती.

तुळशीबाग ही प्रतिबंधित क्षेत्रात येत नाही. त्यामुळे तुळशीबाग परिसर व्यापारी संघटनेने यासंदर्भात पालिका प्रशासनाला निवेदन दिलं होतं. सुरक्षेसंदर्भात उपाययोजना राबवून मार्केट सुरु करण्याची हमी संघटनेने दिली होती.

पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तुळशीबाग परिसरात सुमारे 300 दुकाने आहेत. एक दिवसाआड एक दुकान सुरु करण्याचा व्यापाऱ्यांचा विचार आहे. दुकाने सुरु करताना तुळशीबागेच्या सहा गल्ल्यांच्या एन्ट्री पॉईंटला सुरक्षारक्षक नेमले जाणार आहेत.

खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांचे सॅनिटायझेशन करण्यात येईल. त्याचप्रमाणे ग्राहकांचे तापमान तपासले जाईल, अशी माहिती तुळशीबाग परिसर व्यापारी असोसिएशनने दिली. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील महात्मा फुले मंडईसुद्धा एक तारखेपासून सुरु होणार आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

…तर आळंदीत लग्न करता येणार नाही; ही अट पूर्ण करावी लागणार!

लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढणार?, मात्र ही क्षेत्रं घेऊ शकतात मोकळा श्वास

महत्वाच्या बातम्या-

मी नरेंद्र मोदींशी बोललो, चीनप्रश्नी ते चांगल्या मूडमध्ये नाहीत- डोनाल्ड ट्रम्प

…हा महाराष्ट्र द्रोह आहे आणि गद्दारांना महाराष्ट्र माफ करत नाही- जितेंद्र आव्हाड

“कोरोनाच्या संकटात समाजकार्य करा, साहेबांच्या स्मृतीदिनी गडावर गर्दी नको”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या