बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे विद्यापीठाच्या परीक्षेचा पेच अखेर सुटला; ‘या’ तारखेपासुन परीक्षेला सुरूवात

पुणे | पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षेवरून गेल्या काही दिवसांपासून गोंधळ निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. 9 फेब्रुवारीला झालेल्या बैठकीमध्ये 15 मार्चपासून परीक्षा घेण्यात येणार असल्याचं ठरलं होतं. पण जुन्या एका कंपनीला परीक्षेचा काम देणं हे नियमबाह्य असल्याचं स्पष्ट झाल्यामुळे 15 मार्चला परीक्षा घेणे शक्य नसल्याचं सांगण्यात आलं.

विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण पसरत असताना आता विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलून 11 एप्रिलला परीक्षा सुरू करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. परीक्षेचे स्वरूप हे बहुपर्यायी प्रश्न पद्धतीचे असणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची एसएसपीयु एज्युटेक फाउंडेशन ही कंपनी आता परीक्षा घेणार असल्याचं विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

विद्यार्थ्यांच्या मनात असलेला संभ्रम आता मिटला असून 11 एप्रिल पासून परीक्षेला सुरुवात होणार असल्याचं ठरवण्यात आलेलं आहे. राज्यात कोरोनाचं संकट वाढत असल्यामुळे काही ठिकाणी शाळा व महाविद्यालये पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच पुणे जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष ते अंतिम वर्षापर्यंतच्या परीक्षांचे स्वरूप हे एकसारखाच असून 50 गुणांची ऑनलाइन बहुपर्यायी परीक्षा विद्यापीठातर्फे घेण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या –

लालूंच्या सुरक्षा रक्षकांनी पळवल्या गाद्या आणि उशा; रुग्णालयाची पोलिसांत धाव

पुण्यात मनसेने केक कापून साजरा केला कोरोनाचा वाढदिवस!

‘भाजपमध्ये प्रवेश केला हे चांगलं आहे, पण…’; मिथुन चक्रवर्ती आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यात जुंपली

देवेंद्र फडणवीसांनीच मराठा समाजाचा घात केलाय- नाना पटोले

‘मेल्यावर साहेबांना काय सांगू?’; ‘या’ शिवसेना नेत्याचा उद्धव ठाकरेंना सवाल

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More