पुणे महाराष्ट्र

पुणे विद्यापीठातला धक्कादायक प्रकार; विद्यार्थ्यांमध्ये संताप

पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कमवा आणि शिका योजनेच्या पैशावर माजी विद्यार्थ्यांनीच डल्ला मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांनी 3 लाख 46 हजार रूपयावर हात साफ केल्याची माहिती आहे.

1400 ते 1600 बोगस विद्यार्थ्यांच्या नावाने पैसे उकळले असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. अमोल मगर, सागर काळे, किरण गायकवाड या तिन्ही आरोपींविरोधात चतुश्रृंगी पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कमवा आणि शिका योजनेत विद्यार्थ्यांना ताशी 45 रूपये मानधन मिळतं. दररोज एका विद्यार्थ्याला तीन तास काम करता येतं. या योजनेत अनेक गरीब विद्यार्थी सहभागी होतात. याच योजनेत गैरप्रकार घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी माजी कुलगुरू डाॅ. अरूण अडसुळ यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-शिवसेनेच्या दोन नगरसेवकांमध्ये वाद; एकाने लगावली दुसऱ्याच्या कानशिलात

-उद्धव ठाकरेंचं पीक विमा आंदोलन होऊच देणार नाही- सुभाष देशमुख

मराठा आरक्षण मिळालं… अन् शेतकऱ्याचा मुलगा झाला क्लास-2 अधिकारी!

-“…म्हणून मुंबई महापालिकेविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करा”

-“लोकसभा निवडणुकीनंतर विरोधक आहेत का नाही हे मी शोधतोय”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या