Top News पुणे महाराष्ट्र

पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठीची आरएसएस संदर्भातील कार्यशाळा अखेर रद्द

पुणे |  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी विश्वसंवाद केंद्रातर्फे ‘नोइंग आरएसएस’ या विषयावरील व्याख्यान शनिवार पेठेतील मोतीबाग येथे 15 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आले होते. मात्र, यावरुन वाद निर्माण झाल्याने ही कार्यशाळा रद्द करण्यात आली आहे.

‘नोइंग आरएसएस’ या कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांना संघाच्या मोतीबाग कार्यालयात जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. यावर युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य संघटनांनी आक्षेप घेतला होता. या कार्यक्रमाची माहिती विभागाने नोटीशीद्वारे देऊन त्याचा वेळापत्रकात समावेश केला होता. यावर संघटनांनी आक्षेप घेतला होता.

या प्रकरणावरुन वाद निर्माण झाल्यानंतर वृत्तपत्र व संज्ञापन विभागाच्या प्रमुख उज्वला बर्वे यांनी यावर स्पष्टीकरण दिले. कार्यक्रमाला जाण्याची सक्ती करण्यात आली नसून वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ज्यांना जायचे असेल ते जाऊ शकतात. विद्यार्थ्यांवर सक्ती नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, वाद वाढत असल्याने ही कार्यशाळा रद्द झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला पाठविण्याची आयडीया कुणाची? संज्ञापन आणि वृत्तपत्र विभागात खास नोटीस काढून,वेळापत्रकात संघाशी संबंधित कार्यक्रम जाणीवपूर्वक लावला. कुलगुरुंचीही याला संमती आहे का?, असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर आक्षेप घेतला होता.

ट्रेंडिंग बातम्या-

भारत भेटीला येणाऱ्या ट्रम्पंना झोपडपट्टी दिसू नये म्हणून उभी राहतीये भिंत

विद्यार्थिनींनी घेतली प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ; पंकजा मुंडे संतापल्या

महत्वाच्या बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या