विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत अभाविपला मोठा धक्का

पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या (सिनेट) अधिसभा निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला दारुण पराभवाचा धक्का बसला आहे. दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत त्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलंय.

सभापतीपती नगरच्या दिपाली जाधव यांची तर सचिवपदी नाशिकच्या स्वप्ना बटाटे यांची निवड झालीय. अभाविपकडून दोन्ही जागांसाठी नाशिकच्या प्रतिनिधीला संधी देण्यात आली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. 

दरम्यान, पुणे विद्यापीठाच्या सुमारे 650 महाविद्यालयांमधून 15 विद्यार्थी प्रतिनिधी निवडले जातात. त्यापैकी दोघांची सभापती आणि सचिवपदी निवड होते.