बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आजपासून पुणे अनलाॅक; कोरोना नियमांमध्ये होणार शिथिलता

पुणे | कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे. आता कुठे कोरोना आटोक्यात यायला लागला आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत गेल्या आठवड्यात घट पाहायला मिळत आहे. त्यामुळे सगळं पूर्वपदावर येत आहे. अशातच आता पुणेकरांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे.

पुण्यामध्ये या निर्बंधात आणखी शिथिलता देण्यात येणार असल्यानं पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. काल पुण्यात पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक पार पडली. यामध्ये त्यांनी सोमवारपासून पुणे अनलाॅक होणार असल्याची घोषणा केली.

आजपासून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील खासगी कार्यालये 100 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर पर्यटन स्थळे खुली ठेवण्यास मुभा देण्यात आल्याचं पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

दरम्यान, आजपासून सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरु राहणार आहेत तर शहरातील हॉटेल्स रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. फक्त शनिवारी आणि रविवारी या सर्व गोष्टींना दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या – 

एअर इंडियाला रूळावर आणण्यासाठी बरीच मेहनत करावी लागेल- रतन टाटा

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शेहनाज पहिल्यांदाच आली समोर, पाहा व्हिडीओ

‘जे कोरोना लस घेतील त्यांना फ्रीमध्ये…’; पॉर्नस्टारने दिलेल्या ऑफरने खळबळ

काँग्रेसची दुखणी साध्या उपायांनी बरी होणार नाहीत- प्रशांत किशोर

अखेरचा चेंडू अन् 6 धावा; श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात विराटच्या शिलेदाराचा चमत्कार, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More