पुण्याला मिळणार 4 वंदे भारत एक्सप्रेस; ‘या’ मार्गांवर धावणार

Pune News

Pune News l आजकाल पुणेकर वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करण्यावर अधिक भर देतात. अशातच आता पुणेकरांसाठी एक खुशखबर आहे. सध्या पुण्यातून 2 वंदे भारत एक्सप्रेस
धावत आहेत. मात्र आता लवकरच पुणे शहराला 4 वंदे भारत एक्स्प्रेस मिळणार आहेत. त्यामुळे पुणेकरांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.

चार मोठी शहरे पुण्याच्या जवळ येणार? :

पुण्याला आणखी 4 वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्यास चार मोठी शहरे पुण्याच्या जवळ येणार असल्याचं बोललं जात आहे. म्हणजेच पुढील काही दिवसांत पुण्यात तब्बल सहा वंदे भारत एक्सप्रेस असतील. त्यामुळं पुणेकरांचा प्रवास अत्यंत सुलभ आणि आरामदायक होणार आहे.

वंदे भारत एक्सप्रेस ही भारताची एक प्रीमियम ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये आरामदायी आणि जलद प्रवास करायला मिळतो. कारण जर मुंबई आणि पुणे प्रवास रस्तेमार्गे करताना सहसा 3 ते 3.30 तासांचा वेळ लागतो. मात्र वंदे भारत ट्रेनने प्रवाशांचा हा वेळ वाचतो. याशिवाय पुण्याला आणखीन 4 वंदे भारत एक्स्प्रेस मिळाल्या तर नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

Pune News l ‘या’ मार्गांवर धावणार :

यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने 18 डिसेंबर 2024 रोजी घोषणा केली आहे. त्यामुळे आता या ट्रेन लवकरच पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याचं म्हंटल जात आहेत. तसेच वंदे भारत एक्सप्रेसने पुणे शहराची कनेक्टिव्हीटी देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

वंदे भारत एक्सप्रेस पुणेकरांच्या सेवेत दाखल झाल्यास पुणे-शेगाव, पुणे-सिकंदराबाद, पुणे-वडोदरा, पुणे-बेळगाव या मार्गांवर धावणार आहेत. मात्र या वंदे भारत एक्सप्रेस कधीपासून धावणार यासंदर्भात अद्याप माहिती समोर आलेली नाही. परंतु, लवकरच या 4 वंदे भारत एक्सप्रेस धावणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

News Title – Pune Vande Bharat Express

महत्त्वाच्या बातम्या –

राज्यात टक्कल व्हायरसचा धुमाकूळ; ‘या’ लोकांना सर्वाधिक धोका

कोल्हापूर हादरलं! भाचीच्या लग्नात मामाने जेवणात टाकलं विष अन् अख्ख गाव…

जाणून घ्या पुढील 10 दिवस राज्यातील हवामान कसं असणार?

“कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच, सरकारने…”; मस्साजोग गावकरी प्रचंड दहशतीत?

सुरेश धस अजित पवारांच्या भेटीला, धनंजय मुंडेंच्या वाढणार अडचणी?

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .