बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात वशाटोत्सव, शरद पवार उपस्थित राहणार!

पुणे | राज्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढत असताना चिंता वाढली आहे, अशातच पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वशाटोत्सवाचं आयोजन केलं आहे. या वशाटोत्सवाला राज्यभरातून वशाटप्रेमींची उपस्थिती राहणार असल्याने हा उत्सव वादात सापडण्याची शक्यता आहे. धक्कादायक बाब म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

राज्यात सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. विदर्भ मराठवाड्यासह मोठ्या शहरांमध्ये कोरोनाच्या वाढत्या संख्येनं प्रशासनापुढे पुन्हा आव्हान उभं राहिलं आहे. शिवजयंतीसारख्या लोकांच्या जिव्हाळ्याच्या उत्सवावर बंधनं घालण्यात आली आहे. अशा पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला परवानगी कशी देण्यात आली?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शरद पवार यांच्यासह शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याची माहिती आहे.

येत्या 20 फेब्रुवारीला पुण्यातील चांदणी चौक भागात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. राज्यभरातून वशाटप्रेमी या कार्यक्रमाला येणार असल्यानं कोरोना संक्रमण वाढण्याची भीती आहे. अशा पार्श्वभूमीवर देखील हा कार्यक्रम पार पडणार का?

थोडक्यात बातम्या-

गजावरची कारवाई फक्त ट्रेलर, वेळीच सुधरा नाहीतर… ‘या’ अधिकाऱ्याचा इशारा

अर्जुनला विकत घेतल्यावर मुंबई इंडियन्स म्हणते, क्रिकेट त्याच्या रक्तात आहे!

अखेर सचिनच्या मुलाला मुंबई इंडियन्सनंच विकत घेतलं, इतकी मिळाली किंमत!

सावधान! ‘या’ ठिकाणावरुन पुण्यात यायचं असेल तर कोरोना चाचणी बंधनकारक

सचिनचा मुलगाच नव्हे तर सेहवागचा ‘हा’ नातलगही IPLच्या रणांगणात!

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More