बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खडकवासला धरणातून विसर्ग सुरु, महानगरपालिकेचा नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा

पुणे |  राज्यात मान्सून सध्या चांगलाच सक्रिय झाला आहे. पुण्याच्या खडकवासला धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार चालू आहे. पावसाच्या संततधारेमुळे आज खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. यामुळे आज संध्याकाळी साडेचार वाजता खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेनं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आज दुपारी चार वाजेपर्यंत खडकवासला धरण 95 टक्के क्षमतेनं भरलं होतं. यामुळे साडेचार वाजता धरणातून 2 हजार 466 क्युसेकने विसर्ग  सुरु करण्यात आला आहे. तसेच पावसाची संततधार अशीच चालू राहिली तर पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याचं महानगरपालिकेनं सांगितलं आहे.

दरम्यान, सध्या पुण्यासह मुंबईतील काही भागात देखील जोरदार पाऊस कोसळत आहे. शहरातील उपनगरांत होत असलेल्या पावसामुळे हवामान खात्याने मुंबईसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. येत्या 24 तासांत मुंबईत आणखी जोरदार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याने कोकण, मध्य महाराष्ट्राला पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. कोकणात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या – 

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबाला भाजपची लाख मोलाची मदत, तब्बल 20 लाखाचं फेडलं कर्ज

‘पुण्यासाठी काहीच केलं नाही त्यांचे बॅनर ‘विकासपुरूष’ म्हणून झळकतात’; पवारांचा फडणवीसांवर निशाणा

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसह ठाकरे सरकारला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा झटका!

“मला आता फोन करा, मी तुमच्यासाठी कपडे काढेन”; पूनम पांडेचा धक्कादायक खुलासा!

पॉर्न प्रकरणात मोठी बातमी! राज कुंद्राने क्राईम ब्रांचला दिली इतक्या लाखांची लाच???

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More