बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे हादरलं! वाढदिवसाच्या बहाण्याने 14 वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार

पुणे | आजकाल बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. ना वय, ना नाती, लोकांना कशाचं भान राहीलं नसल्याने देशातील गुन्हेगारी टोकावर जात आहे. अशातच एका घटनेनं पुणे शहराला सुन्न करुन टाकलं. एका 14 वर्षाच्या मुलीला वाढदिवसाला बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

जनता वसाहतीत राहणाऱ्या एका 14 वर्षाच्या मुलीला वाढदिवसानिमीत्त घरी बोलावलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. एवढ्यावरच न थांबता आरोपीने त्याच्या दोन मित्रांना देखील तुझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे असल्याचं संबंधित मुलीला सांगितलं. या गोष्टीला मुलीने नकार दिल्यानंतर त्यांनी चक्क गोळीबार केला.

या संपुर्ण प्रकरणाची तक्रार मुलीने दत्तवाडी पोलीस ठाण्यात नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं आहे. यापैकी पिस्तुल बाळगण्याऱ्या आरोपीचं नाव श्रीकांत काळे असं आहे. तसेच यामध्ये दोन जणांना अटक केली असून एकाच नाव कृष्णा उर्फ अशोक ओव्हाळ तर दुसऱ्याचं नाव निरंजन उर्फ निलेश शिंदे असं आहे.

विशेष म्हणजे प्रकरणात सामील असलेल्या आरोपींचे वय 25 च्या आत असून देशातील तरुण पिढी जास्त गुन्हे करत असल्याचं दिसून येत आहे.

थोडक्यात बातम्या-

नवनीत राणांचा विनामास्क आदिवासींसोबत डान्स, पाहा व्हिडीओ

एकाच षटकात हार्दिक पांड्याने मारले तीन गगनचुंबी षटकार, पाहा व्हिडीओ

अखेर 6 दिवस अडकलेलं महाकाय जहाज सुटलं; ‘इतक्या’ हजार कोटींचं नुकसान

‘मुख्यमंत्र्यांनी झोपडपट्टीत फिरावं अन्…’; चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

“सपासप कोयत्याचा आवाज काळीज चिरत जातो, वाटते हे वार कोबीवर नसून आपल्याच छातीवर होत आहेत”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More