Top News पुणे महाराष्ट्र

पुणे पुन्हा हादरलं, ‘या’ संघटनेच्या प्रमुखाची धारदार शस्त्रांनी वार करुन हत्या

पुणे | पुणे जिल्हा ता.हवेलीतील पेरणे फाटा येथे शिवबा संघटनेचे पदाधिकारी गोविंद भिकाजी कुमकर यांच्यावर अज्ञात हल्लेकोरांनी हल्ला व अपहरण करुन त्यांचा खून केला.

या प्रकरणी सुषमा गोविंद कुमकर यांनी लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी हल्ला, अपहरण आणि खूनप्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.

सकाळी दहाच्या सुमारास गोविंद हे घराबाहेर पडून पेरणेफाटा येथे पुणे-नगर रस्त्यालगत संतकृपा कॉम्पलेक्सच्या समोर आले होते. त्यावेळी अचानक अज्ञात चार ते पाच जणांनी त्यांच्यावर सशस्त्र हल्ला चढवला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

तसेच स्कॉर्पियो जीपमधून त्यांचे अपहरणही केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे परिसरात घबराट उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! बीडमध्ये तरूणीवर अॅसिड हल्ला; हल्ल्यानंतर जिवंत जाळलं

मुख्यमंत्री होण्याची माझी इच्छा नव्हती; नितीश कुमारांचा मोठा खुलासा

बिहारच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा नितीश कुमारांची वर्णी; उद्या घेणार शपथ

प्रसिद्ध अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचं निधन

पुढील 10 ते 20 वर्षे नरेंद्र मोदींना पर्याय नाहीये- बाबा रामदेव

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या