राज्यातील ‘या’ भागात पुढील तीन दिवस धो धो पाऊस कोसळणार, यलो अलर्ट सारी

Pune Weather Update | आठवडाभर विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. मुंबई,पुणे तसेच मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यात आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुण्यात 20 जून ते 23 जूनपर्यंत पावसाची शक्यता असून घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या पर्यटकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

पुण्यात पुढील तीन दिवस मुळसधार पावसाची शक्यता

दरम्यान, आज राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबई जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसंच पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यासोबतच बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे वादळी वारा आणि वीजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे (Pune Weather Update ) या भागाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात ‘या’ भागांना यलो अलर्ट

राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोकण, पुणे आणि साताऱ्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर, विदर्भासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात पुण्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. संपूर्ण शहरात मुसळधार पावसाने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पहिल्याच पावसात पुण्यात (Pune Weather Update ) अनेक ठिकाणी पाणी शिरले होते. आता पुढील तीन दिवस पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

News Title –  Pune Weather Update 20 june