बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पुण्याचा विकास होणार, ठाकरे सरकारच करणार’

पुणे | सध्या पुणे शहरात ‘होर्डींग वार’ चांगलंच रंगलं आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यामध्ये होर्डींग्ज लावण्यात आले आहेत. या होर्डींग्जवर ‘विकासपुरुष आणि पुण्याच्या विकासाचे शिल्पकार’ असा फडणवीसांचा उल्लेख करण्यात आला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘लयभारी कारभारी’ असा उल्लेख करत अजित पवारांचे होर्डींग्ज लावण्यात आले आहेत.

पुण्यामध्ये चालू असणाऱ्या या होर्डींग वाॅरमध्ये आता शिवसेनेनं देखील उडी घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 27 जुलै रोजी वाढदिवस आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त देखील पुण्याच्या मुख्य चौकांमध्ये होर्डींग्ज लावण्यात आले आहेत. या होर्डींग्जवर ‘पुण्याचा विकास होणार, ठाकरे सरकारच करणार’, असा मजकूर लिहिण्यात आला आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चाललेल्या या होर्डींग वाॅरची चर्चा पुण्यात चांगलीच रंगली आहे. या होर्डींग्जवरुन पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये या बॅनरबाजीवरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जाणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. यामुळे सर्वच पक्षांनी पुण्यावर लक्ष केंद्रीत करणं चालू केलं आहे. महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मोर्चेबांधणी देखील जोरात सुुरू झाली आहे.

थोडक्यात बातम्या –

घरात-दुकानात पाणी शिरलेल्यांना ‘इतक्या’ हजारांची मदत; ठाकरे सरकारचा निर्णय

“जनतेचं म्हणणं ऐकून घेणं हे कर्तव्य आहे, ते पार पडलं पाहिजे”

‘झारखंड सरकार पाडण्यात केंद्रासह महाराष्ट्रातील भाजपच्या ‘या’ नेत्याचा हात’; राष्ट्रवादीेचा आरोप

राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, पोलिसांना ऑफिसमध्ये सापडली धक्कादायक गोष्ट!

‘बदनामीला घाबरू नकोस…’; चिपळूणमधील त्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी भास्कर जाधवांना दिला सल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More