बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पॅरोलवर सुटलेल्या आरोपीची रॅली काढणं अंगलट; पोलिसासह 8 जणांना अटक

पुणे | लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुण्यातील गुन्हेगारीत वाढ झाली आहे. एवढंच नाही, तर आता कारागृहातून सुटलेल्या आरोपींची रॅली काढण्यासही सुरुवात झाली आहे. येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटलेल्या आरोपींची रॅली काढण्यात आली होती.

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी समीर मुलानी आणि जमीर मुलानीची रॅली निघाली होती. रॅलीत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेतील पोलीस शरीफ मुलानीचाही सहभाग होता. याप्रकरणी पोलिसांनी शरीफसह आठ जणांना अटक केली आहे.

येरवडा कारागृहाच्या बाहेर आरोपींची रॅली निघाली होती. फॉर्च्युनर, स्विफ्ट आणि स्कॉर्पिओसह आरोपींचा ताफा निघाला.  या ताफ्याबरोबर 20 ते 25 दुचाकींवर 30 ते 40 जणांचे टोळके गोंधळ घालत सहभागी झाले होते. आरोपीचे भाऊ नातेवाईक आणि सहकाऱ्यांनी रॅली काढली होती. बेकायदा जमाव जमवून सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवला‌. रॅलीतील हुल्लडबाजांनी मास्कही वापरला नव्हता.

याबाबतची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी कारवाई केली. यावेळी गाड्यांमध्ये एका गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतूस लोखंडी बार जप्त केला. कारवाईत 8 जणांना अटक झाली असून मुख्य आरोपीसह इतर आरोपी फरार आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

वाढदिवसानिमित्त रूपाली चाकणकरांचं कार्यकर्त्यांना विशेष आवाहन

सॅनिटायझरचा अतिवापर करत असाल तर सावधान; होऊ शकतो ‘हा’ धोका!

महत्वाच्या बातम्या-

पीएम केअर फंडला भरभरुन मदत; मात्र त्याबद्दल माहिती द्यायला पीएमओचा नकार

‘…म्हणून शिवसेना आज भाजपसोबत नाही’; संजय राऊत यांनी सांगितलं खरं कारण

“पाच वर्षे खिशात राजीनामे असताना सरकार तरलं, मग आताच कसं पडेल?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More