#MeToo चळवळीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या तरुणांनी समोर आणली ‘ती’!

पुणे । पुण्यातील काही तरूणांनी ब्रीवर्स नावाच्या यूट्यूब चँनलवरून ‘ती’ नावाची वेबसीरीज सुरू केली आहे. स्त्री ही बहीण, बायको, आई, मुलगी अशा अनेक भूमिका पार पाडत असते. प्रत्येक भूमिकेतील तिच्या अस्तित्त्वाची, कर्तृत्त्वाची किंमत घरातील माणसांना कळत नाही. अशा छोट्या गोष्टींची किंमत कळण्याचा उद्देश या वेबसीरीजचा आहे.

सध्या सोशल मीडियावर मीटूचं वादळ उठलंय. पण प्रत्येक घरातील स्त्री ही मानसिक दृष्ट्या सुरक्षित असण्याची गरज आहे. ही गोष्ट समाजासमोर आणण्यासाठी सुशांत धारवाडकर, चिन्मय कुलकर्णी, अभिषेक दवे, संकेत ढेरे, अजिंक्य माने या तरूणांनी पुढाकार घेऊन ही सीरीज सुरू केली.

या सीरिजचे ती:बहिण, ती:बायको ती:मुलगी, ती:आई हे एपिसोड आले आहेत.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या