Top News पुणे महाराष्ट्र

मुलीचं प्रेम बापाला नव्हतं मान्य; पुण्यात प्रियकराची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या

पुणे | पर्वती येथील शाहूनगर वसाहतीमध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास एका तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. दत्तवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून या हत्या प्रकरणाचं कारण देखील समोर आलं आहे.

आदर्श ननावरे (वय २२, रा. धायरी), बोंबल्या उर्फ अभिषेक काळे आणि यशवंत कांबळे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. अमित मिलिंद सरोदे (वय-२१) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी अमितच्या मित्रानं पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, यशवंत कांबळे हा बांधकाम व्यवसायिक आहे. आदर्श ननावरे त्याच्याकडे कामाला आहे. अमितचं आरोपीच्या मुलीशी प्रेमसंबंध होते, ते आरोपीला मान्य नव्हते. त्याने अमितला आपल्या मुलीपासून लांब राहण्यास सांगितलं होतं, मात्र अमितनं याला नकार दिला होता.

अखेर आरोपीनं आदर्शच्या मदतीने अमितचा काटा काढण्याचा प्लॅन केला. रविवारी रात्री अमित आपल्या मित्रासोबत शाहूनगर वसाहतीतील बालाजी होलसेलसमोर उभा असताना आदर्शने त्याच्यावर गोळी झाडली तर बोंबल्यानं त्याच्यावर कोयत्यानं वार केले. पोलिसांनी काही तासात आरोपींना गजाआड केलं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून 25 वर्षीय महिलेनं महिला पोलिसाचा हात पिरगळला; महिलेला अटक

सचिन पायलट यांच्या समर्थकांची नाराजी काँग्रेसला भोवली, राजस्थान काँग्रेसमध्ये भूकंप!

100 वर्षीय आजोबांची कोरोनावर मात; वाढदिवसाचा केक कापूनच मिळाला डिस्चार्ज

मुंबईसह राज्यभरात ऑरेंज अलर्ट जारी; ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा

कोरोनावर मात करण्यासाठी शरद पवारांनी बारामतीकरांसाठी दिली अनोखी भेट!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या