पुणे | दारु विक्रीला परवानगी दिली जाते, मग आरोग्यास आवश्यक असणाऱ्या मॉर्निंग वॉकला का नाही? असा सवाल पुणेकरांनी उपस्थित केला आहे. पुण्याचे रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना पत्र लिहिलं आहे.
पुण्यात ‘कोरोना’चा संसर्ग कमी असणाऱ्या परिसरात मॉर्निंग वॉकला परवानगी देण्याची मागणी सजग नागरीक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवून आणि तोंडाला मास्क लावून मॉर्निंग वॉकला करण्याच्या सूचना द्याव्यात असं विवेक वेलणकर यांनी म्हटलं आहे.
कोरोनाला बळी पडणाऱ्यांमध्ये मधुमेह, रक्तदाब इत्यादी रोग असलेल्यांचं प्रमाण जास्त आहे. या सर्वांना डॉक्टर रोज सकाळी मोकळ्या हवेत तासभर फिरण्याचा व्यायाम करायला सांगतात, जे त्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी आवश्यक आहे, असं वेलणकर म्हणाले आहेत.
एकीकडे आरोग्याला घातक ठरणारी दारु आठ तास विकायची आणि विकत घ्यायची सोय करण्यात आली असताना आरोग्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या एक तासाच्या मॉर्निंग वॉकवर मात्र बंदी कायम ठेवणं चुकीचं आणि अतार्किक आहे, असं विवेक वेलणकर म्हटलंय.
ट्रेंडिग बातम्या-
अंबानी कुटुंबाने खूप मदत केली, त्यांच्या मदतीशिवाय हा प्रवास पूर्ण झाला नसता- नीतू कपूर
“इस्रायल कोरोना विरोधात लस निर्मितीपासून काही पावलं दूर”
महत्वाच्या बातम्या-
दारूची होम डिलिव्हरी मिळणार; ‘या’ सरकारनं घेतला निर्णय
‘अनुजने माझी मान अभिमानाने उंचावली’; शहीद मेजर अनुज सूद यांना अखेरचा निरोप
मुंबईत IPS अधिकाऱ्याला कोरोनाची लागण; राज्यभरात 457 पोलिसांना कोरोना
Comments are closed.