बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणेकरांनो काळजी घ्या!; कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक

पुणे | पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका सॅनिटायझरचा वापर करा. असं आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना वारंवार करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. पुण्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे. आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 5 हजार 651 पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. तर दिवसभरात 4 हजार 361 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 54 जणांना आपल्या प्राणांना मुकावं लागलं आहे. तर 13 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 957 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 3,05,372 इतकी आहे. तर पुण्यात 46 हजार 071 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 5 हजार 567 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 2,53,734 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 26 हजार 120 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. राज्य सरकारच्या निर्देशानुसार उद्यापासून पुणे महानगरपालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने 30 एप्रिल 2021 पर्यंत बंद असणार आहेत. तसेच राज्य सरकारच्या विकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणीही शहरात काटेकोरपणे केली जाणार आहेत.

थोडक्यात बातम्या – 

“अनिल परबांच्या राजीनाम्यासाठी देखील आता न्यायालयाचे आदेश येण्याची वाट बघावी लागेल का?”

सचिन वाझेंनी केलेल्या आरोपांवर अनिल परब म्हणाले, ‘बाळासाहेबांची आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो…’

लवकरच देवेंद्र फडणवीस घेणार शरद पवार यांची भेट!

नागरिकांनो कुटुंबाची काळजी घ्या!; दिल्लीतील डॅाक्टरांचं कोरोनाबद्दल धक्कादायक निरीक्षण

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानात काय सांगितलं?; साऱ्या देशाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर उघड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More