बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणेकरांनो काळजी घ्या!; कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक

पुणे | पुण्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या हळूहळू पुन्हा वाढत आहेत. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारंवार हात साबणाने धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा. त्याशिवाय आता उपाय नाही, अस आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागत कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील. पुण्यातही कोरोना आपले हातपाय पसरवत आहे. आजची आकडेवारीही धक्कादायक आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 1352 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 646 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 7 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

पुण्यात सध्या 364 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2,11,521 इतकी आहे. तर पुण्यात 7719 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 4910 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 1,98,892 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 7721 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंदच राहणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘सचिन वाझे जणू ओसामा बीन लादेन…’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

“जो पर्यंत मुख्यमंत्री गप्प तो पर्यंत विधानसभा ठप्प”

‘पंकजांचा पराभव धनंजय मुंडेंनी केला की’.., अजित पवारांचे सूचक वक्तव्य

“सत्ता गेल्यानं अनेकांना सहन होत नाही अन् सांगताही येत नाही”

राखी सावंतचा नागीन अंदाज पाहिलात का?; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More