पुणेकरांनो सावध व्हा; ‘या’ पुलावरून जाणं तुमच्यासाठी ठरेल धोक्याचं
पुणे | गेल्या काही दिवसांपासुन महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसानं जोर धरला आहे. सतत चालू असणाऱ्या पावसामुळे अनेक धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. पुणेकरांची तहान भागवणाऱ्या खडकवासला धरणातूनही मुठा नदी पात्रात वेगानं पाणी सोडण्यात आलं आहे.
मुठा नदी पात्रात पाणी सोडल्यानं भिडे पूल आणि नदी पात्रातील रस्ता पाण्याखाली गेला आहे. यामुळे या भागातून प्रवास करणं टाळावं, अशा सूचना पुणे महानगर पालिकेकडून देण्यात आल्या आहेत.
खडकवासला भागातून प्रवास करणं टाळावं. तसेच पात्रालगतच्या रहिवाशांनी अधिकची काळजी घ्यावी, अशाही सूचना पालिकेकडून देण्यात आल्या आहेत.
खडकवासला धरण 100 टक्के भरले असून धरणाच्या सांडव्यातून सुरू असलेला विसर्गही वाढवून दुपारी 1 वाजता 11.99 क्युसेक करण्यात आला आहे. दिवसभरात खडकवासला धरण परिसरात 22 मिलिमीटर, पानशेत धरण भागात 84 मिलिमीटर, वरसगाव आणि टेमघर धरण क्षेत्रात अनुक्रमे 75 आणि 60 मिलिमीटर पाऊस पडला.
थोडक्यात बातम्या-
“एवढी मोठी फाटाफूट झाली पण राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटला नाही, याचा मला अभिमान वाटतो”
एकनाथ शिंदेंचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना झटका; ‘तो’ आदेशच बदलला
मोठी बातमी! राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा
कॉमेडियन वीर दासने पुन्हा उडवली भारताची खिल्ली, म्हणाला…
धक्कादायक! गुजरातमधून 350 कोटींचं हेराॅइन जप्त
Comments are closed.