पुणे | पुणे महानगरपालिकेने 31 डिसेंबरला खाद्यपदार्थांच्या घरपोच डिलिव्हरीवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे आता पुणेकरांना रात्री 11 नंतर घरगुती बेत आखूनच थर्टी फस्ट साजरा करावा लागणार आहे
पुणे महानगरपालिकेनं 31 डिसेंबरला खाद्यपदार्थाच्या घरपोच डिलिव्हरीवर निर्बंध घातले असून, रात्री 10.45 पर्यंतच खाद्यपदार्थांची होम डिलिव्हरी सुरु असणार आहे. त्यानंतर पुणेकरांना कोणतेही खाद्यपदार्थ घरपोच मिळणार नाहीत.
पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्तराँ तसेच बार 31 डिसेंबर रोजी रात्री पावणे अकरापर्यंतच सुरु राहणार आहेत. नागरिकांनी नवीन वर्षाचे स्वागत करताना काय काळजी घ्यावी यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी आदेश जारी केला आहे.
नववर्षाच्या निमित्ताने आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यांवर गर्दी करु नये, असे आवाहन ठिकठिकाणी करण्यात येत आहे.
थोडक्यात बातम्या-
तांबेंनी हर्षवर्धन पाटलांवर केलेल्या ‘त्या’ टीकेला लेक अंकिता पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…
हरियाणातील भाजप सरकारला मोठा धक्का!
कामाला लागा, पोलिसांना घरे बांधून द्या- उद्धव ठाकरे
महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना; पेणमध्ये तीन वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून हत्या
सावधान! कोरोना लसीकरणाच्या नावाखाली तुमची फसवणूक होऊ शकते