बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अविनाश भोसले यांच्या अडचणी वाढल्या; पोलिसांकडून गुन्हा दाखल

पुणे | पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यासह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीन दस्त, नोंदणी संदर्भात दिशाभूल केल्याच्या आरोपावरुन भोसले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रातंवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

अविनाश भोसलेसह विकास ओबरॉय, विनोद गोयकां, सिद्धार्थ मयुर याच्यांसह 14 जणांवर संगमवाडी येथील चेतन निकम यांच्या जमीनीची चुकीची नोंद केल्याचा आरोप आहे. सहदुय्यम निबंधक एल. एम. संगावार यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. या 14 जणांवर कागदपत्रामंध्ये फेरफारीसह नोंदणी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी चेतन निकम यांनी हवेली दुय्यम निबंधक कार्यालयात अर्ज दिले होते. अर्जाची चौकशी केल्यानंतर त्यामध्ये नोंदणी कायद्याच उल्लंघन केल्याचं आढळून आलं. उल्लंघन केल्याचं उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या 14 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता अविनाश भोसले यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

अविनाश भोसले यांची याआधीही ईडीने 4 कोटीची मालमत्ता जप्त केली आहे. विदेशी चलनाप्रकरणातही भोसले यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात आली होती. कोट्यावधीच्या एबीआयएल या ग्रुपचे मालक असणारे अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत.

थोडक्यात बातम्या- 

“NCB अधिकारी समीर वानखेडेंचे कॉल डिटेल्स तपासा, भाजप नेत्यांचे कॉल दिसतील”

‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं; पाहा काय आहे आजचा भाव

पुढील 4,5 दिवस ‘या’ भागात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

मोठी बातमी! विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत पुणे महानगरपालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पोस्टाची बंपर योजना, महिन्याला 1500 रूपये गुंतवल्यास मिळू शकतात 35 लाख रूपये

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More