पुणे महाराष्ट्र

आता पुण्याच्या दोन मेट्रो स्टेशनवर दिसणार पुणेरी पगडी!

नवी दिल्ली | पुणे मेट्रोचे दोन स्टेशन पुणे पगडीच्या आकारात बांधले जाणार आहेत. याबाबतची माहिती महामेट्रोचे एमडी ब्रजेश दीक्षित यांनी दिली आहे. 

पुणे मेट्रोसाठी 2000 कोटी अर्थसहाय्यासाठीचा महत्त्वाचा करार दिल्लीत पार पडला, त्यावेळी दीक्षित यांनी ही माहिती दिली. पीसीएमसी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी अशा दोन फेजमध्ये काम चालू आहे, असंही त्यांनी त्यावेळी सांगितलं.

संभाजी पार्क आणि डेक्कन हे दोन स्टेशन पूणेरी पगडीच्या आकाराचे बनवले जाणार आहेत, अशी माहिती महामेट्रोने यावेळी दिली.

दरम्यान, महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन शहरांमध्ये सध्या मेट्रोचं काम सुरु आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-मला पुणे महापालिकेचं राजकारण उमगलं नाही- शरद पवार

-बीडमध्ये राष्ट्रवादीच्या काका-पुतण्यांमध्ये रंगली टस्सल; पाहा कुणी मारली बाजी…

-जेव्हा हार्दिक पांड्या शिखर धवनवर चिडतो… 

-आता मोदींना घरी पाठवण्याची वेळ आली- चंद्राबाबू नायडू

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार कन्येचा पराभव

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या