Highest Temperature l पुणे (Pune) शहरात सध्या ३७ अंश सेल्सिअस कमाल तापमान असून, पुढील चार-पाच दिवसांमध्ये ते याच पातळीवर राहण्याची शक्यता आहे. मात्र, दुपारच्या वेळी उन्हाचा चटका जाणवणार असल्याने, नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी (Dr. Anupam Kashyapi) यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यासह राज्यातही शिरूर (Shirur) आणि कोरेगाव पार्क (Koregaon Park) रविवारी (दि.२) सर्वाधिक ‘हॉट’ ठरले.
तापमान वाढीचे कारण? :
गेल्या दोन दिवसांपासून शहरामध्ये कमाल तापमान वाढले असून, किमान तापमानही वाढले आहे. किमान तापमान १४ ते १५ अंशांवर होते, ते आता १७ अंशांच्या पुढे नोंदवले जात आहे. स्थानिक पातळीवरील बदल हे येथील अधिक तापमानाचे कारण असू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
राज्यामध्ये सोलापूर (Solapur) ३७.९, मालेगाव (Malegaon) ३७.६, जळगाव (Jalgaon) ३६.२, रत्नागिरी (Ratnagiri) ३६.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
Highest Temperature l पुढील हवामानाचा अंदाज :
सध्या राज्यातही उष्णता जाणवत असून, ३ व ४ मार्च रोजी दक्षिणेकडून येणाऱ्या आर्द्रतेमुळे दक्षिण महाराष्ट्रात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. यानंतर उत्तर दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवेशामुळे पुढील ४-५ दिवस राज्यातील दिवसभराचे तापमान कमी होण्याची शक्यता आहे, असे कश्यपी यांनी सांगितले.
शिरूर – ३८.२
कोरेगाव पार्क – ३८.२
पुरंदर – ३७.४
चिंचवड – ३६.८
मगरपट्टा – ३६.५
शिवाजीनगर – ३६.२
एनडीए – ३५.८
हवेली – ३५.६
लोणावळा – ३५.४
पाषाण – ३५.०
बारामती – ३५.२
भोर – ३४.३
गेल्या तीन-चार वर्षांपासून पुणे शहरामध्ये पूर्व भाग मगरपट्टा, वडगावशेरी, कोरेगाव पार्क येथे तापमान चांगलेच वाढत आहे. त्या परिसरात सर्वाधिक तापमानाची नोंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.