बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ह्रदयद्रावक! पुण्याच्या वेदिका शिंदेचा अखेरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

पुणे | स्पायनल मस्कुलर एॅट्राॅफी या दुर्मीळ आजाराशी लढा देणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील चिमुकल्या वेदिका शिंदेने आज जगाचा निरोप घेतला. वेदिकाच्या पालकांकडे उपचारासाठी पैसे नसल्यानं त्यांनी सोशल मीडियावर मदतीचं आवाहन केलं होतं. उपचारासाठी 16 कोटी रुपयांच्या औषधाची गरज असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर नेटकऱ्यांनी या पोस्टला तुफान प्रतिसाद देत तब्बल 16 कोटी रुपये जमा केले होते.

वेदिकाच्या आजारावर 16 कोटींचं इंजेक्शन हा एकच पर्याय होता. वेदिकासाठी अख्खा देश एकत्र आला. यामध्ये अभिनेते, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसेवक यांनीही मदत करत आणखी मदतीसाठी आवाहन केलं. अखेर 16 कोटी रक्कम जमा झाली आणि वेदिकाला ते औषध मिळालेलं. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. रविवारी अचानक तिची प्रकृती खालावली. त्यानंतर तिने जगाचा निरोप घेतला. तिचे वडिल सौरभ शिंदे यांनी याची माहिती दिली आहे. 

या बातमीनंतर नेटकऱ्यांनाही धक्का बसला आहे. वेदिकाच्या आई-वडिलांनी तिचं इंस्टाग्राम अकाउंट तयार केलं होतं. यावर त्यांनी तिच्या जाण्याअगोदरचे काही व्हिडीओ पोस्ट केले होते. यामध्ये ती खेळताना दिसत आहे.

दरम्यान, व्हिडीओमध्ये वेदिकाच्या चेहऱ्यावरील तेज आणि हास्य पाहून कोणीही म्हटणार नाही की ही चिमुकली एवढ्या मोठ्या आजाराचा सामना करत होती. इतक्या लवकर वेदिका जगाचा निरोप घेईल असं कोणलाही वाटलं नव्हतं.

थोडक्यात बातम्या-

सावधान राहा! ‘हे’ पाच पदार्थ पुन्हा गरम करुन खाऊ नका, कारण…

‘ऑडिशनमध्ये निवड व्हावी म्हणून मी फोन सेक्स केला पण…’; अभिनेत्रीचा गौप्यस्फोट

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात असा असेल पाऊस?, वाचा हवामान खात्याचा अंदाज!

पुण्याला तातडीने शिथिलता देण्याचे आदेश काढावेत; महापौरांची राज्य सरकारकडे मागणी

एकीकडे ठाकरे-फडणवीसांची भेट, तर दुसरीकडे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More