पुणेकरांसाठी खुशखबर! पुण्याचा पाणीप्रश्न सुटला, मुळशी धरणातून ‘इतके’ TMC पाणी मिळणार

पुणे | पुण्यातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच पुणे शहरालगतच्या 23 गावांचा देखील महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. यामुळे शहराला पुरेशा प्रमाणात पाणी मिळण्याचा प्रश्न उपस्थित होत होता. याच पार्श्वभूमीवर पुण्याचा पाणीप्रश्न सुटला असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

पुण्यातील मुळशी धरणातून आता शहराला 5 टीएमसी पाणी मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री अजित पवारांनी दिली आहे. तसेच याच्या बदल्यात सरकार टाटा कंपनीला वीज देणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे.

पुण्यातील मुळशी धरण हे टाटा कंपनीच्या मालकीचं आहे. त्यातून वीज निर्मीती होते. पाच टीएमसी पाण्यातून निर्माण होणारी तितकीच वीज सरकार टाटा कंपनीला देणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पुण्यातील वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतो. मात्र वेळीच यावर मार्ग काढण्यात आल्यानं पुण्यातील नागरिकांना पाण्याच्या समस्याला सामोरं जावं लागणार नाही.

थोडक्यात बातम्या-

‘सोमय्यांच्या कारवाईशी मुख्यमंत्र्यांचा संबंध नाही’; दिलीप वळसे पाटलांचं स्पष्टीकरण

“सोमय्यांना पळून जावं लागलं, कोल्हापूरचा ‘पैलवान’ गडी कोणाला ऐकणार नाही”

भारताची ‘व्हॅक्सिन मैत्री’! आता इतर देशांनाही पुरवणार कोरोना लस

‘आम्ही चौकशी केली, त्यात कोणताही घोटाळा झालाच नाही’; देवेंद्र फडणवीसांनी आरोप फेटाळले

“आमचा विश्वासघात झालाय, ‘ते’ मुख्यमंत्रिपदाच्या लायक नाहीत”

5 tmc5 टीएमसीAjit PawarDamElectricityGuardian MinisterLatest NewsMarathi NewsmulshiPunewater problemअजित पवारधरणपाणी समस्यापालकमंत्रीपुणेमुळशीवीज