बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हे खपवून घेणार नाही’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना पत्र

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या साम्राज्याच्या माध्यमातून परकीय आक्रमणांना माघारी लावलं होतं. त्यांच्या पराक्रमाच्या गाथा आजही साता समुद्रापार शिकवल्या जातात. पण आपल्याच देशात त्यांच्या प्रतिमांची विटंबना होत आहे. कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या विटंबनेनंतर राजकारण तापलेलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काळं फासण्यात आल्यानंतर आता राजकारण तापलं आहे. या घटनेची सर्व स्तरातून तीव्र निंदा करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून भाजपशासित राज्यात झालेल्या या प्रकराबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बंगळुरूमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विटंबना प्रकरण अतिशय निंदनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. तसेच कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस, विकृत मनोवृत्तीचा बीमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालून तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावं, अशा तीव्र शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बस्वराज बोम्मई यांनी या घटनेचा निषेध करण्याऐवजी ही घटना एक छोटी घटना आहे, असं वक्तव्य केल्यानं सर्व स्तरातून भाजपवर टीका करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या 

“रामदास कदमांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झालीये”

“दोन एकर विकून पोराला शिकवलं पण पोराचा संयम ढासळला”

कुत्रे अन् माकडांमध्ये युद्ध पेटलं; पिल्लाला मारल्यानंतर ‘बदला’ घेण्यासाठी माकडांनी 250 कुत्र्यांना संपवलं

सहकार चळवळ मागे का पडली?, हजारो कोटींचे घोटाळे कसे झाले?- अमित शहा

“अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्हा वाऱ्यावर सोडला आहे, त्यांना तर…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More