बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नियम मोडणाऱ्या वऱ्हाडींना पोलिसांनी शिकवला धडा, पहा काय घडलं..!

भोपाळ | देशभरात कोरोना महामारीनं थैमान घातल्यानं सर्व राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. लोकांनी गर्दी करू नये म्हणून पोलीस आपलं कर्तव्य चोख बजावत आहेत. पण यातही काही नग कोरोना नियमांचं पालन न करता बिनधास्त फिरताना दिसत आहे. त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करायला लागत आहे. असाच एक प्रकार मध्य प्रदेशच्या दातिया भागात घडला आहे. त्यामुळे पोलिसांनी थेट वऱ्हाडींना डान्स करण्याची शिक्षा दिली आहे.

दतियाच्या राजगड चौकामध्ये चेकींग पॉईंटवर पोलिसांनी काही जणांना अडवलं होतं. त्यांना कुठे चालले आहात अशी विचारणा पोलिसांनी केली. त्यावर लग्नाला गेलो होतो आणि आता परत चाललो असल्याचं त्यांनी सांगितलं. जवळच्या नातेवाईकांच लग्न होतं का?, असा सवाल त्यांनी केला. त्यावर त्यांनी नाही असं उत्तर दिलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना डान्स करण्याची शिक्षा दिली. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पोलिसांनी या वऱ्हाडींना नाचण्यासाठी ‘छत पे सोया था बहनोई…’ हे गाणं लावलं. हे गाणं लावल्यानंतर त्यावर या सर्वांनी केलेला डान्स पाहून सर्वांना हसू फुटलं होतं. गाण्यावरचा हा नागीण डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सध्या मध्य प्रदेशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये लाॅकडाऊन लावण्यात आलं आहे.

दरम्यान, असाच एक प्रकार भिंड मध्ये समोर आला आहे. त्यात पोलिसांनी वरातीत नाचणाऱ्यांना बेडूक उड्या मारण्याची शिक्षा दिली होती. या प्रकरणात नवरदेवाला आणि इतरांना शिक्षा देण्यात आली होती. तर नवरदेवावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

“राजभवनात भुताटकीचा वावर, एकदा शांतीयज्ञ करून घ्यावा लागेल”

राज्याला मदत मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी केंद्राला पत्र लिहावं- रोहित पवार

कृषी कायद्यांविरोधात सुरु झालेल्या शेतकरी आंदोलनाला 6 महिने पूर्ण; 26 मे रोजी शेतकरी काळा दिवस पाळणार

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या पत्रानंतर अखेर रामदेव बाबांकडून वक्तव्य मागे!

माणुसकीचं नातं कसं असावं हे निलेश लंकेंनी दाखवलं- जयंत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More