बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जिंकलेला सामना गमवायची पंजाबला सवय झाली आहे – अनिल कुंबळे

नवी दिल्ली | मोठ्या थाटामाटात आयपीएलची युएईमध्ये सुरूवात झाली आहे. जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा म्हणून आयपीएलला ओळखलं जातं. आयपीएलचं विजेतेपद मिळवणं हे प्रत्येक संघाचं स्वप्न असतं. पंजाब किंग्ज संघाला आजपर्यंत एकदाही विजेतेपद मिळवता आलं नाही.

पंजाब संघाने हातात आलेला सामना गमावल्यानं सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. पंजाब संघाला मोक्याच्या वेळी कच खाणारा संघ म्हणून ओळखलं जात आहे. 19 तारखेला झालेल्या दुसऱ्या पर्वातील आपल्या पहिल्या सामन्यात पंजाबला राजस्थानकडून अवघ्या 2 धावांनी पराभव स्विकारावा लागला. पंजाब संघाला जिंकलेला सामना गमवायची सवय लागली असं वाटत आहे, असं म्हणत अनिल कुंबळे यांनी आपल्याच संघाच्या कामगिरीवर ताशेरे ओढलं आहेत.

पंजाब संघ राजस्थान विरूद्धचा सामना जिंकण्याच्या परिस्थितीत होता. शेवटच्या षटकात अवघ्या 4 धावा हव्या असताना सुद्धा पंजाबला केवळ 2 धावा काढत्या आल्या आणि पंजाबचा पराभव झाला. आमचा संघ हातात आलेला सामना जिंकायला कसा मिळवायचा हे विसरल्याची खंत सुद्धा अनिल कुंबळे यांनी व्यक्त केली आहे.

प्रत्येक खेळाडूने विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरायला हवं, पण झालेला पराभव हा विसरता येण्यासारखा नाही. या शब्दात कुंबळे यांनी पराभवावर भाष्य केलं आहे. पंजाबची फलंदाजी ही सर्वोत्तम फलंदाजी म्हणून ओळखली जाते.

थोडक्यात बातम्या 

फडणवीस सरकारच्या काळातील घोटाळे महाविकास आघाडी बाहेर काढणार!

दिल्ली ते अमेरिका, कित्येक तासांचा प्रवास, मोदींचं ‘वर्क फ्रॉम प्लेन’ पाहिलं का?

‘कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार इतके हजार रुपये’; केंद्राचं सर्वोच्च न्यायालात उत्तर

“महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका”

नरेंद्र मोदी 3 दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर; मोदींंचं अमेरिकेत जंगी स्वागत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More