बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दीपक हुड्डाला मोठा धक्का; बीसीसीआय करणार हुड्डाची चौकशी!

नवी दिल्ली | कोरोनाच्या संकटामुळे मे महिन्यात स्थगित झालेली आयपीएल स्पर्धा 19 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. मंगळवारी पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघात अटीतटीचा सामना झाला. त्यामध्ये पंजाबच्या तोंडाशी आलेला घास राजस्थान रॉयल्सने हिसकावून घेतला. त्यामुळे पंजाबच्या फंलदाजांवर चहुबाजूंनी टीका होत असताना सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे पंजाबचा अष्टपैलू खेळाडू दीपक हुड्डा आता अडचणीत सापडला आहे.

राजस्थान रॉयल्सविरूद्ध होणाऱ्या सामन्यांआधी दीपक हुडाने इन्स्टाग्रामवर फोटोसह एक पोस्ट शेअर केली आहे. ‘आम्ही येत आहे. पंजाब किंग्जविरूद्ध राजस्थान रॉयल्स. आयपीएल 2021. आपलं पंजाब’. अशी पोस्ट मंगळवारी सामना सुरू होण्याच्या अगोदर दीपक हुड्डाने केली होती. त्यानंतर खुप मोठा गोंधळ उडाला होता. ही पोस्ट भ्रष्टाचारविरोधी मार्गदर्शक तत्वांचे उल्लघंन करते की नाही, हे शोधण्याचा प्रयत्न बीसीसीआयचे एसीयु युनीट करणार आहे. सध्या बीसीसीआय शब्बीर हुसेन शेखादम खंडवाला यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्टाचारविरोधी युनिट आयपीएलवर बारीक लक्ष ठेऊन आहे.

सोशल मीडियावर काय करावे आणि काय करू नये यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आलं आहेत. माजी प्रमुखांनी असेही स्पष्ट केलं आहे की, पीआर संघ खेळाडूंची काही सोशल मीडियावरील खाती हाताळत आहेत. परंतु खेळाडूंनी त्यांच्या बाजूने कोणतेही अडचण येणार नाही. याची काळजी घेण्याची गरज आहे, असं एसीयुच्या एका अधिकाऱ्यांने सांगितलं आहे.

दरम्यान, पंजाबला शेवटच्या षटकात 4 धावांची गरज असताना कार्तिक त्यागीने केलेल्या अफलातून गोलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्सने 2 धावांनी सामना जिंकला. याआधी प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 185 धावा केल्या होत्या. त्यानंतर सलामीला आलेल्या फलंदांजानी दमदार सुरूवात केल्यानंतरही पंजाबला फक्त 184 धावा काढता आल्या आणि हातातला सामना गमवला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepak Hooda (@deepakhooda30)

थोडक्यात बातम्या-

बाबो! तालिबान्यांनी फाडून टाकला पाकिस्तानचा झेंडा, व्हिडीओ व्हायरल

किरीट सोमय्यांनी थोपटले दंड! सोमय्या पुन्हा कोल्हापूर दौऱ्यावर

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत तालिबानचा मुद्दा; योगी आदित्यनाथ म्हणाले…

“राजू शेट्टी फितूर झाले, साखर कारखानदारांसोबत त्यांनी सेटलमेंट केली”

”माझी पत्नी अंघोळच करत नाही, मला घटस्फोट हवा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More