प्रीति झिंटाने शाहरुख खानला विकत घेतलं, आर्यन-सुहाना बघतच राहिले
बंगळुरू | आयपीएल लिलावाला आजपासून सुरूवात झाली आहे. दोन दिवसांच्या लिलावामध्ये मोठ्या खेळाडूंवर बोली लावली जात आहे. त्यातच तामिळनाडूचा आक्रमक फिनिशर शाहरूख खान चांगली बोली लागल्याचं पाहायला मिळत आहे. पंजाब किंग्जने शाहरूख खानला 5 कोटी रूपयांना घेतलं आहे.
आयपीएलच्या मागील हंगामामध्ये शाहरूख खानने 11 मॅचमध्ये 153 रन केले होते. तर त्याचा स्ट्राईक रेट 134 इतका होता. मिडल ऑर्डरमध्ये खेळणाऱ्या शाहरूख खान भूमिका फिनिशरची आहे. त्याच्या क्षमता पाहता पुन्हा एकदा पंजाब किंग्सने आपल्या संघात सामील केलं आहे.
लिलावामध्ये शाहरूख खानची बेस प्राईस 40 लाख इतकी होती. 40 लाख इतकी बेस प्राईज असलेल्या शाहरूख खानला खरेदी करण्यासाठी जोरदार चुरस निर्माण झाली होती. चैन्नई सुपर किंग्जनेही प्रयत्न केले. मात्र, शाहरूख खान पुन्हा एकदा पंजाबच्या टीममध्ये परतला आहे.
दरम्यान, आयपीएल 2022 च्या लिलावात इशान किशन सर्वाधिक रक्कम मिळवणारा खेळाडू ठरला आहे. मुंबई इंडियन्सने ईशान किशनला तब्बल 15.25 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. ईशान किशन आयपीएल इतिहासातला चौथा सगळ्यात महागडा आणि दुसरा महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे.
थोडक्यात बातम्या-
“अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेमधून बाहेर जावं लागेल”
“यमदेव घेऊन जातो तेव्हा त्याच्या जवळही रेडा असतो, म्हणूनच…”
“शिवसेनेेचे वाघ असतात, वाघांचा बाजार नसतो… भाजपने पाठीत खंजीर खुपसला”
“महाविकास आघाडीतील छोट्या पक्षांना कवडीचीही किंमत देत नाहीत, शरद पवारांनी…”
फडणवीस म्हणतात, “संजय राऊतांना कोण घाबरतंय, पाचवीतील मुलंही…”
Comments are closed.