बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

थरारक सामन्यात अखेर पंजाब किंग्ज विजयी; संजू सॅमसनची तुफानी खेळी

मुंबई | अखेरच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून ठेवणाऱ्या सामन्यात अखेर पंजाब किंग्जने बाजी मारत विजय आपल्या पारड्यात पाडला. अखेरच्या चेंडूवर राजस्थान रॉयल्सला 5 धावांची गरज असताना कर्णधार संजू सॅमसनने जोरदार फटका मारला. पण बाँड्रीलाईनवर उभ्या असलेल्या दीपक हुडाने झेल पकडत सामना फिरवला. या झेल बरोबर पंजाब किंग्जने या हंगामातील पहिला विजय नोंदवला आहे.

पंजाबने राजस्थान समोर 222 धावांचं तगडं आव्हान ठेवलं. 222 धावांच्या पाठलाग करताना राजस्थानची सुरवात खराब झाली. सलामीचे फलंदाज झटपट बाद झाले. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनने अखेरपर्यत खिंड लढवली. याच वेळी त्याने दमदार शतक ठोकले. त्याने 63 चेंडूत 119 धावा केल्या. दुसऱ्या बाजूने एक एक फलंदाज बाद होत असताना संजू मैदानात टिकून राहिला.

त्याआधी टॉस जिंकून राजस्थानने पंजाबला फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. सुरवातीपासून पंजाबने फटकेबाजी चालू केली. युनिव्हर्सिल बॉस ख्रिस गेलने 28 चेंडूत 40 धावा केल्या तर कर्णधार केएल राहुलने 50 चेंडूत 91 धावा केल्या. तर नंतर दीपक हुडाने सर्वांना आश्चर्यचकित करत 28 चेंडूत 64 धावा ठोकत राजस्थानला 222 धावांचं तगडं आव्हान दिलं.

दरम्यान, पदार्पणात कर्णधारपद सांभाळताना शतक ठोकणारा संजू सॅमसन हा पहिला खेळाडू ठरला आहे. तर या आयपीएल हंगामातील हे पाहिलं शतक आहे. या सामन्यानंतर युवा गोलंदाज चेतन साकरिया सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यानं पदार्पणात 4 षटकात 3 महत्वाचे बळी मिळवले, तर फाईन लेगला एक सुंदर झेल घेतला होता.

थोडक्यात बातम्या-

पुण्यात कोरोना आटोक्यात?; दिवसभरात तब्बल ‘इतक्या’ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिलासा, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

संभाजी भिडे यांची प्रकृती अचानक बिघडली, रुग्णालयात केलं दाखल

मावळ तालुक्यात पवनानगर येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना लस घेण्यासाठी नागरिकांची झुंबड

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना CBI ने बजावला समन्स

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More