बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रसिद्ध पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा भीषण अपघातात मृत्यू

नवी दिल्ली | पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याचा मंगळवारी अपघाती मृत्यू झाला आहे. दीप सिद्धू याच्या कारला दिल्लीजवळ भीषण अपघात झाला. अपघात झाला तेव्हा कारमध्ये दीप सिद्धूसोबत त्याची मैत्रिण देखील होती.

दिल्लीजवळील कुंडली सीमेवर दीप सिद्धूच्या कारला अपघात झाला. या अपघातात दीप सिद्धूचा मृत्यू झाला तर त्याची मैत्रिण गंभीर जखमी झाली आहे. दीप सिद्धूची कार एका ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला.

दीप सिद्धूची कार रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला जाऊन जोरात धडकली. यात दीप सिद्धूचा मृत्यू झाला. दीप सिद्धूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खारखोडा रूग्णालयात ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, अपघातावेळी कारमध्ये असलेल्या दीप सिद्धूच्या मैत्रिणीची प्रकृती चिंताजनक असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

 

थोडक्यात बातम्या-

संजय राऊतांच्या आरोपावर किरीट सोमय्या यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“असा तुरुंग अजून बनला नाही जो मला 2 वर्षे तुरुंगात ठेवू शकतो”

“चाटायचं असेल तेव्हा पवारसाहेब आणि चावायचं असेल तेव्हा…”

“शिवसेना सोडू नाहीतर दलालाला जोड्यानं मारु”; 19 बंगल्यांबद्दल राऊत संतापले

“ईडीच्या कार्यालयात रोज दही-खिचडी खातो, याच्या बापाचं राज्य आहे का इथं?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More