बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रोमांचक सामन्यात पंजाबचा दणदणीत विजय! सनरायजर्स हैदराबादचा 5 धावांनी पराभव

मुंबई | आयपीएलच्या दुसऱ्या सत्रातील 38 वा सामना पंजाब किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्या खेळण्यात आला. या रोमांचक सामन्यात अखेर पंजाबने 5 धावाने विजय मिळवला आहे. रवी बिश्नोई आणि मोहम्मद शमीने घातक गोलंदाजी करत पंजाबला विजय मिळवून दिला आहे.

प्रथम नाणेफेक जिंकून हैदराबादने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबकडून सलामीला आलेल्या मयंक अग्रवाल आणि केएल राहूलला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानंतर आलेल्या युनिव्हर्सल बाॅस ख्रिस गेलने केवळ 20 धावा केल्या अखेर मार्करम आणि हरमनप्रीत प्रारने काही धावा काढत पंजाबची लाज राखली. हैदराबादच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करत पंजाबचे फलंदाज ढेर केले. त्यात जेसन होल्टरने महत्त्वाचे 3 गडी बाद केले.

पंजाबने दिलेल्या 126 धावांचं आव्हान हैदराबाद आरामात पार करेल असं वाटलं होतं. परंतू सनरायजर्स हैदराबाद फलंदाज फेल झाले. डेव्हिड वाॅर्नर आणि कर्णधार विल्यम्सन झटपट बाद झाले. त्यानंतर हैदराबादचे सर्व फलंदाज पत्त्यासारखे कोसळले. त्यानंतर जेसन होल्डरने आक्रमक फटकेबाजी केली.

दरम्यान, सामना जिंकण्यासाठी अखेरच्या षटकात हैदराबादला 17 धावांची गरज होती. त्यानंतर अखेरच्या चेंडूत हैदराबादला 7 धावांची गरज होती. मात्र होल्डरला केवळ 1 धाव काढता आली.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! पुण्यातील ढोल-ताशा पथकाला हैदराबादेत डांबलं, 15 मुलींचाही समावेश

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

‘…तर त्या देशांना कर्माची फळे भोगावी लागतील’; जागतिक मंचावरून पंतप्रधान मोदींचा इशारा

यूपीएससीचा अभ्यास करताना कमी दिसू लागलं, मात्र तिनं हार मानली नाही; आज देशात चर्चा!

भारताचं ‘ते’ जुनं स्वप्न होणार लवकरच पूर्ण! जो बायडन यांच्याकडून भारताचं तोंडभरून कौतूक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More