बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नारायण राणेंच्या दर्शनानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला दुग्धाभिषेक आणि गोमूत्राने शुद्धीकरण

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआर्शीवाद यात्रेला मुंबईतून सुरूवात केली. यात्रा सुरु करण्यापुर्वी नारायण राणेंनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केलं होतं. मात्र नारायण राणे निघून गेल्यावर शिवसैनिकांनी स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलं आहे. यावरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचे केअर टेकर आप्पा पाटील यांनी दुग्धाभिषेक त्यानंतर गोमूत्राने हे शुद्धीकरण केलं. शुद्धीकरणानंतर तिथं फुल वाहण्यात आली. नारायण राणे सकाळी दर्शनासाठी आले होते. त्यामुळे ते गेल्यावर हे शुद्धीकरण केलं असल्याचं बोललं जात आहे. या शुद्धीकरणावेळी आप्पा पाटील आणि सेनेचे लोकलचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आज ही वास्तू अपवित्र झाली आहे. त्यामुळे तिथे दुग्धाभिषेक आणि शुद्धीकरण करण्यात आलं. बाळासाहेबांची फ्रेम पाण्याने धुवून तिच्यावर दुग्धाभिषेक केला आणि बाळासाहेबांना आवडणारी चाफ्याची फुलं वाहण्यात आलीत. राणेंना इतके दिवस शिवसेना दिसली नाही. सेनेला सोडून गेल्यानंतर त्यांना बाळासाहेब दिसले नाहीत, अशा शब्दात आप्पा पाटील यांनी राणेंवर निशाणा साधला.

दरम्यान, टॉप 5 मुख्यमंत्र्यांमध्ये असणारे मुुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तुम्ही काहीही बोलता. आम्ही ठाकरे घराण्याबद्दल निष्ठा ठेवणारे आहोत त्यामुळे आम्ही हे सहन करू शकत नाही. म्हणून हे शुद्धीकरण केल्याचं पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“आधी केलेली पाप धुवून काढा, मगच आशीर्वाद मागा”

‘…त्यानंतर मी स्वतः ईडी समोर जाणार’; अनिल देशमुखांनी सोडलं मौन

“शिवरायांप्रमाणे मलाही स्वकियांनी त्रास दिला”; शिवसेना सोडताना आशाताई आक्रमक

“तालिबानचं समर्थन करणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे”

शिवसेनेला मोठा धक्का, आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळख असलेला ‘हा’ चेहरा भाजपमध्ये!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More