बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आधी संघ-भाजपला विरोध, आता युती!; पुरुषोत्तम खेडेकरांनी सांगितलं खरं कारण

मुंबई | मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेडने भाजपशी युती करावी. सध्याची राजकारणाची ती गरज असल्याचं म्हटलं. यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं. मराठा सेवा संघाच्या 32 व्या वर्धापन दिनानिमित्त मराठा मार्ग मासिकात लिहिलेल्या लेखात पुरुषोत्तम खेडेकर यांनी ही भूमिका मांडली.

भाजप आणि आरएसएसला विरोध करणाऱ्या खेडेकरांनी आता थेट संभाजी ब्रिगेडला भाजपशी युती करण्याचा सल्ला दिला आहे. यानंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र आता खेडेकरांनी लेखात मांडलेल्या भूमिकेवर स्पष्टीकरण दिलं आहे.

संभाजी ब्रिगेड म्हणजे राष्ट्रवादीचं पिल्लू आहे अशा प्रकारे अनेक वर्षे आमची हेटाळणी देखील झाली. पण आता वेळ आलीय ती काहीतरी भूमिका घ्यायची. त्यानुसार संभाजी ब्रिगेडने भाजपशी युती करण्याचा विचार करावा, असं पुरूषोत्तम खेडेकर म्हणाले.

दरम्यान, माझ्या लेखापाठीमागे ही भूमिका आहे की, राजकारण हे राजकारणासारखं व्हावं. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सत्ता मिळविण्यासाठी आम्ही स्वबळावर लढलो, पण मोजक्या स्थानिक स्वराज्य संस्था वगळता लोकसभा विधानसभेत आम्हाला यश मिळालं नाही. राजकारणात सध्या युती आघाड्यांचा काळ आहे, हे फक्त आपल्या राज्यात आहे, असं नाही. तर देशभरातही आहे. तसेच काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा पर्याय आमच्यासमोर जवळपास नाहीच आहे. आता भाजपचा पर्याय उरला आहे, असंही खेडेकर यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

“कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी ही कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होतेय?”

बॉडी बिल्डर मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न; धक्कादायक कारण आलं समोर

राज कुंद्रा प्रकरणात मोठी अपडेट; आता शिल्पा शेट्टी बनणार साक्षीदार

एयरोस्पेस कंपनीनं 9 वर्षांनी रचला इतिहास, पहिल्यांदाच सामान्य नागरिक झेपावले अंतराळात

मराठा सेवा संघ भाजपसोबत?, पुरुषोत्तम खेडेकरांच्या नव्या लेखानं खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More