बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी विरोधकांमध्ये धक्काबुक्की; कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब

मुंबई | विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात झाली आणि विरोधकांनी सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतल्याचं पहायला मिळालं. ओबीसीच्या मुद्यावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. विरोधकांनी सभागृहात सरकारविरोधात घोषणाबाजीही केली.

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे. यानंतर सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकार इम्पेरीकल डाटा उपलब्ध व्हावा तसा ठराव मांडला. पण ठराव मांडू न दिल्यामुळे भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घातला.

भाजप आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे धाव घेतली आणि माईक खेचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सभागृह 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. भास्कर जाधव दालनकडे जात होते, तेव्हा भाजपच्या आमदारांनी त्यांना घेराव घातला.

दरम्यान, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा केवळ राजकीय ठराव असल्याची टीका केली. देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सात दिवसाची नोटीस देणे बंधनकारक आहे. आधी नियम स्थगित करायला हवा होता. जी सूचना आलेली आहे ती कायद्यात बसत नाही असं सांगत आक्षेप घेतला.

थोडक्यात बातम्या- 

“भागवतांनी हिंदू- मुस्लीम ऐक्यावर बोलणं म्हणजे RSSने सरड्याप्रमाणे रंग बदलणं”

‘सगळं कामकाज बाजूला ठेवा पण MPSC वर चर्चा घ्या’; फडणवीस आक्रमक

“170 आमदार असून काय उपयोग?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा राहुल गांधी बरे”

“ओबीसींच्या इम्पिरीकल डेटाचा ठराव म्हणजे वेळकाढूपणाचं धोरण”

एमपीएसीच्या रिक्त जागांबाबत अजित पवारांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More