लाडक्या मुख्यमंत्र्यांना मोदींनी दाखवला अंगठा; पत्रातील मागणी फेटाळली

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अगदी जवळचे असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्र्यांची बुलेट ट्रेन संदर्भातील एक मागणी नरेंद्र मोदींनी झुगारुन लावली आहे.
बुलेट ट्रेन नाशिकमार्गे वळवावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींजवळ केली होती. त्यासाठी फडणवीसांनी पंतप्रधानांना 13 जानेवारी 2016 मध्ये पत्र लिहिलं होतं.
रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्राला उत्तर देत, बुलेट ट्रेन नाशिकमार्गे वळवणे परवडणारं नाही, असं म्हटलं आहे.
दरम्यान, ही सर्व माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी समोर आणली आहे. 
महत्वाच्या बातम्या-