बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मामाचा फोन घेतला नाही, कॉलबॅक राहिला अन्…”; पुष्कर जोगला रडू आवरेना

मुंबई | सिनेसृष्टीतील आणि ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता पुष्कर जोग याच्या मामांचं नुकतंच निधन झालं आहे. मामाचा फोन उचलू शकलो नाही, त्याला कॉल बॅक करायचा राहिला आणि दुसऱ्याच दिवशी मामा सोडून गेल्याची दुःखद बातमी कानी आली, असं सांगताना पुष्कर जोगला अश्रू अनावर झाले. या कठीण काळात प्रियजनांच्या संपर्कात राहा, असं आवाहन पुष्करनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना केलं.

‘हा काळ आपल्या सर्वांसाठी प्रचंड कठीण आहे, तेव्हा हेवेदावे, रुसवे-फुगवे, वैचारिक मतभेद सर्व काही कृपया बाजूला ठेवा आणि आपल्या नातेवाईक, मित्र परिवार आणि आप्त स्वकीयांच्या संपर्कात रहा. कॉल मेसेज तर कधीच कुणाचा मिस करू नका’,  अशी  कळकळीची विनंती पुष्करने केली आहे.

‘पाडव्याच्या दिवशी मला माझ्या गोव्याच्या मामाचा फोन आला. मला म्हणाला कसा आहेस, मुंबईची परिस्थिती कशी आहे, काळजी घे. नुकतीच माझी एक फिल्म रिलीज झाली होती. मी त्याला विचारलं, मामा माझा सिनेमा कधी बघणार आहेस? तो म्हणाला माझ्याकडे ओटीटी चॅनेल नाही, मी म्हटलं हरकत नाही मामा, दोन-तीन महिन्यांनंतर चॅनेलवर फिल्म येईल, तेव्हा तू बघ’, असं बोलणं झाल्याचं पुष्करनं सांगितलं. त्यानंतर 21 एप्रिलला सकाळी 8 वाजता मामाचा मला परत फोन आला. मला लवकर उठायची सवय नसल्यामुळं मी त्याचा फोन उचलू शकलो नाही. त्याच दिवशी त्याला कॉल बॅक करायचा राहून गेलं. 22 एप्रिलला, म्हणजे त्याच्याच दुसऱ्या दिवशी मला माझ्या कुटुंबाकडून समजलं की, गोव्याचा सतीशमामा गेला’, असं सांगतानाच पुष्करला अश्रू अनावर झाले.

दरम्यान, आपण नेहमी, आपल्या मित्र, नातेवाईकांचा फोन येतो, तेव्हा म्हणतो, जाऊदे नंतर करु. असं नका करु, आता मिस्ड कॉल नको, कॉल बॅक करा, त्यांना विचारा, कसे आहात, सगळं व्यवस्थित आहे ना, त्यांना सांगा आम्ही आहोत, असं आवाहन पुष्करनं चाहत्यांना केलं आहे.

 

पाहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Pushkar Suhas Jog (@jogpushkar)

 

थोडक्यात बातम्या

‘लव यू जिंदगी’ म्हणत ती धैर्यानं कोरोनाशी लढली, मात्र नियतीला काही वेगळंच हवं होतं!

‘या’ राज्यात पुन्हा मृत्यूचे थैमान! मध्यरात्री ऑक्सिजन संपला; 4 तासांत 13 रुग्णांचा मृत्यू

मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

फेसबुकवरील मैत्रीनं घातला 2 लाखांचा गंडा; नंतर केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य 

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर विठू-रखुमाई आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीला हापूस आंब्याची आरास

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More