‘पुष्पा 2’ चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला मिळालं इतक्या कोटींचं मानधन!

Pushpa 2 OTT Release

Pushpa 2 Cast Salary l जगभरात साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या बहुचर्चित ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाने सिनेमागृहामध्ये प्रचंड धुमाकूळ घातला आहे. कारण ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांत जगभरात तब्बल 800 कोटी रुपयांहून अधिकचा गल्ला जमवला आहे. मात्र अनेकांना असा प्रश्न पडला आहे की, तब्बल 400 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटातील कलाकारांनी किती मानधन घेतलं आहे. तर आज आपण यासंदर्भात सविस्तर जाणून घेऊयात…

पुष्पा 2: द रुलने तोडले जावं चित्रपटाचं रेकॉर्ड :

‘पुष्पा 2: द रुल’ हा चित्रपट 5 डिसेंबर 2024 रोजी जगभरातील थिएटरमध्ये रिलीज झाल्यापासूनच प्रत्येक चित्रपटगृहात हाऊसफुल्लचे फलक लटकलेले दिसत आहेत. कारण या चित्रपटानं पहिल्याच दिवशी सर्व भाषांमध्ये रेकॉर्ड तोडले आहेत. त्यामुळे आता हिंदी भाषेत देखील सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटानं आश्चर्यकारक कामगिरी केली असल्याने अभिनेता शाहरुख खानच्या जवानला मागे टाकत पहिल्या क्रमांकाचा सलामीवीर ठरला आहे.

मात्र या चित्रपटामध्ये अभिनेता अल्लू अर्जुन लीडला आहे. त्यामुळे चित्रपटाची संपूर्ण कथा अल्लू अर्जुनच्या आसपास फिरताना दिसत आहे. तसेच या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार अभिनेता अल्लू अर्जुनने सरासरी 300 कोटी रुपये एवढे मानधन घेतले असल्याची माहिती मिळाली आहे.

Pushpa 2 Cast Salary l रश्मिकाचं मानधन किती? :

याशिवाय या चित्रपटामध्ये श्रीवल्लीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रश्मिका मंदानाने देखील मोठं मानधन घेतलं असल्याचं बोललं जात आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार रश्मिका मंदान्नानं या चित्रपटासाठी तब्बल10 कोटी रुपये इतकं मानधन घेतलं असल्याचं समजत आहे.

तर ‘पुष्पा 2’ च्या ट्रेलरमध्ये फहाद फासिलच्या स्टाईलनं सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र यावेळी फहादनं या चित्रपटासाठी 8 कोटी इतकं मानधन घेतलं असल्याचं समजत आहे. तसेच हा चित्रपट रिलीज होऊन सात दिवस उलटले आहेत. मात्र तरी देखील या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

News Title –  Pushpa 2 Cast Salary

महत्वाच्या बातम्या-

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात रक्त गोठवणारी थंडी, शाळांच्या वेळात मोठा बदल

मंत्रीपदासाठी इच्छुक व नाराजांसाठी एकनाथ शिंदे वापरणार ‘हा’ पॅटर्न?, चर्चेला उधाण

“माझं डोकं पिसाळलं तर…”; मनोज जरांगे संतापले, पण कुणावर?

मोक्षदा एकादशीला भगवान विष्णू व लक्ष्मी ‘या’ राशींवर ठेवणार कृपादृष्टी!

भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी!

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .