प्रतीक्षा संपली! बहुप्रतीक्षित ‘पुष्पा 2’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज

Pushpa 2 | साऊथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) त्याच्या ‘पुष्पा 2’ (Pushpa 2 ) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. याच्या पहिल्या पार्टने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. पहिल्या पार्टमधील त्याच्या भूमिकेसाठी अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारदेखील मिळाला आहे.(Pushpa 2 )

अभिनेत्री रश्मिका आणि अल्लू अर्जुन यांचे शूटिंगदरम्यानचे अनेक लुक व्हायरल झाले आहेत.अशात ‘पुष्पा द रुल’ चित्रपटाचं नवीन पोस्टर समोर आलं असून चित्रपटाची रिलीज डेटही जाहिर करण्यात आली आहे. ‘पुष्पा : द रूल’ (Pushpa 2 The Rule) चित्रपटासाठी चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असताना ही गुड न्यूज समोर आली आहे.

Pushpa 2 चित्रपटाचे नवीन पोस्टर समोर

निर्मात्यांनी चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. पोस्टरमध्ये अभिनेता अल्लू अर्जुन’पुष्पराज’च्या अवतारात दिसत आहे. ‘पुष्पा 2’ च्या नवीन पोस्टरसह टॅगलाइन आहे, ‘त्याचा रुल 100 दिवसांत पहा’. पुष्पा 2 चित्रपट आजपासून 100 दिवसांनी थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज आहे. पुष्पा 2 चित्रपटाच्या या नवीन पोस्टरने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.(Pushpa 2 )

चित्रपटाच्या फर्स्ट-लूक पोस्टरमध्ये अल्लू अर्जुन एका महिलेच्या वेशात दिसला होता. तेव्हा अभिनेता ‘गंगम्मा तल्ली जथारा’ मध्ये सामील होणार असल्याचे म्हटले गेले. तिरुपतीमध्ये ‘गंगाम्मा तल्ली जथारा’ ही एक प्रचलित प्रथा आहे. दरवर्षी आठवडाभर हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी पुरुष स्त्रियांच्या वेशभूषा करतात आणि गंगम्माच्या रूपात दिसतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mythri Movie Makers (@mythriofficial)

‘या’ तारखेला रिलीज होणार पुष्पा 2

गंगम्मा ही देवी वाईट प्रवृत्तींचा नाश करणारी म्हटले जाते. अभिनेता अल्लू अर्जुन पुष्पा 2 मध्ये याच अवतारात दिसणार असल्याचे म्हटले गेले. कानात झुमके, गळ्यात सोन्याची दागिने तसेच लिंबूचा हार, लाल टिकली आणि काजळ असा अवतार घेत अल्लू अर्जुनचा पहिला लुक पोस्ट करण्यात आला होता. त्यामुळे चाहते या चित्रपटासाठी उत्सुक (Pushpa 2 ) आहेत. अशात चित्रपटाचे दुसरे पोस्टर देखील समोर आले आहे.

दरम्यान, सुकुमार दिग्दर्शित आणि फहद फासिल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 6 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. याच्या पहिल्या पार्टने बरीच कमाई केली होती. आता चाहते याच्या दुसऱ्या पार्टची आतुरतेने वाट बघत आहेत.

News Title- Pushpa 2 release date announced

महत्त्वाच्या बातम्या –

भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा कुख्यात गुंडाने केला सत्कार; नेमकं काय समीकरण असणार

लाडकी बहीण योजनेसाठी आता घरबसल्या आधार कार्ड बँकेला लिंक करा; जाणून घ्या स्टेप्स

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार

सलमानच्या हेल्थवरून चाहते चिंतेत? व्हिडिओ पाहून तुमचंही वाढेल टेन्शन

Jio चा ग्राहकांना आणखी एक दणका?, अनलिमिटेड कॉलिंग, डेटा प्लॅन होणार बंद?