बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Pushpa: अभिनेता अल्लू अर्जुन स्वतःच्याच आवाजाच्या प्रेमात, म्हणाला…

मुंबई | मनोरंजन विश्वात ‘पुष्पा’ या चित्रपटानं चांगलाच गराळा घातला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर ‘पुष्पा’ ची तुफान चर्चा पहायला मिळत आहे. खूप कमी वेळात जास्तीत जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी पुष्पा हा एक आहे.

अभिनेता अल्लू अर्जुनची हटके स्टाईल, जबरदस्त अभिनयानं प्रेक्षकांचे मन जिंकून टाकले. यासोबतच नॅशनल क्रश असलेली अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या दिलखेचक अदांनी हा चित्रपट हिट ठरला आहे. मात्र यासोबत आणखी एका गोष्टीची भरपूर चर्चा होताना दिसत आहे. ती म्हणजे अल्लू अर्जुनच्या हिंदी वर्जन चित्रपटातल्या आवाजाची.

काही दिवसांपूर्वीच ‘पुष्पा’ या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले. हिंदी व्हर्जनमध्ये अल्लू अर्जुनला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे. स्वतः अभिनेता अल्लू अर्जुुनही स्वतःच्या आवाजाच्या प्रेमात पडला आहे. श्रेयशने दिलेल्या या आवाजाचं सध्या सर्वत्र कौतूक होताना दिसत आहे.

दरम्यान, श्रेयसजी चित्रपटासाठी तुमचा सुंदर आवाज दिल्याबद्दल खूप आभार. लवकरच आपण भेटू अशी अपेक्षा करतो. ऑन कॅमेरा मी तुमचे आभार मानू इच्छित आहे. ‘पुष्पा’ या पात्रात स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन काम केल्याबद्दल तुमचे खूप आभार, असं अल्लू अर्जुननं म्हटलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

थोडक्यात बातम्या – 

Gold Price: सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर

“शाहिस्ते खानाची नुसती बोटंच छाटली होती तुझा पंजाच छाटला जाईल”

‘मला खूप भरुन येतंय भावांनो…’; किरण मानेंची भावूक पोस्ट व्हायरल

“नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा आणि पुण्यातल्या ‘येरवड्या’त दाखल व्हावं”

“नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More